Alibag News : गणेशोत्सवानिमित्ताने अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना रेशन दुकानामधून ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची घोषणा करून जवळपास महिना झाला आहे. गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना रवा, चणाडाळ, पाम तेलापैकी साखरेचा साठा जिल्ह्यातील फक्त तीन गोदामांमध्ये दाखल झाला आहे. इतर वस्तूंचा अद्याप पत्ताच नाही. त्यामुळे उरलेल्या पाच दिवसांत आनंदाचा शिधा मिळणार कसा, असा प्रश्न जिल्ह्यातील लाभार्थी विचारत आहेत.
नेहमीप्रमाणे आताही जिल्हा पुरवठा विभागाला आनंदाच्या शिधाचे वेळेत वाटप करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. सण-उत्सवाआधी आनंदाचा शिधा मिळाला, असे आतापर्यंत एकदाही झालेले नाही.
होळी, दिवाळी, गणेशोत्सवानंतरच आनंदाच्या शिधाचे वाटप होते. शेवटच्या ग्राहकांना काही वस्तू मिळतात, तर काही वस्तू कीटमधून गायब झालेल्या असतात. आतातर पुरवठा विभागाने कहरच केला आहे.
जिल्ह्यात लाभार्थी कार्डधारकांची एकूण संख्या चार लाख ६३ हजार ६१० इतकी असताना एकूण तीन लाख ९६ हजार ९९१ इतक्याच लाभार्थ्यांचे धान्य मंजूर झाले आहे. मागणी कमी प्रमाणात मंजूर झाल्याने इतर लाभार्थ्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यातील
लोकप्रतिनिधींचे फोटो नसणार
आतापर्यंत मिळालेल्या आनंदाच्या शिधा कीटवर देशातील, राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींचे फोटो असायचे. जोपर्यंत अशा पिशव्या छापून येत नाही, तोपर्यंत वितरण थांबवले जात असे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आताचा शिधा वाटपही अशा छापील पिशव्यांमधून होईल, असा अंदाज होता; परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आताच्या पिशव्यांवर लोकप्रतिनिधींचे फोटो नसतील.
खास पिशव्यांतून वाटप
आनंदाचा शिधा एका खास पिशवीमध्ये वाटला जातो, ज्या पिशवीवर देशातील, राज्यातील प्रमुख नेत्यांचे फोटो असतात. अशा छापील पिशव्याही अद्याप आलेल्या नाहीत. जोपर्यंत छापील पिशव्या येत नाहीत, तोपर्यंत पुरवठा विभागाकडून त्याचे वितरण केले जात नाही. या सर्वातून मार्ग काढत पुरवठा विभागाला शिधा पोहोचवावा लागणार आहे.
चार वस्तू १०० रुपयांत
गणेशोत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल हा शिधा वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ चे १५ सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
ई-पॉसद्वारे वाटप काही दिवसांपुर्वी
धान्य वितरण व्यवस्थेच्या सर्व्हरमध्येबिघाड निर्माण झाल्याने ई-पॉस प्रणालीद्वारे केला जाणारा ऑनलाइन धान्य पुरवठा बंद करून ऑफलाइन धान्य वाटप सुरू करण्यात आले होते. सर्व्हरमधील बिघाडाची दुरुस्ती करण्यात आलले ी असल्याने ई-पॉस प्रणाली पर्ण ू सक्षमपणे काम करीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातून देण्यात आली असनू या प्रणालीद्वारेच आनंदाचा शिधा लाभार्थ्यांची बायोमट्ॅ रिक ओळख पटल्यानंतरच मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.
‘आनंदाचा शिधा’ कीटमधील जिन्नस अद्याप जिल्ह्यात दाखल झालेल्या नाहीत. वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारामुळे त्यास वेळ लागत आहे. यासंदर्भात राज्य शासनाला कळविण्यात आलेले आहे. कंत्राटदाराकडून आम्हीही आढावा घेत असून सर्वजिन्नस वेळेत पोहोचाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड
‘आनंदाचा शिधा’ कधीही वेळेत मिळालेला नाही. मिळाला तर त्यातील एखादी वस्तू गायब झालेली असते. सणाचे दिवस संपल्यानंतर मिळणाऱ्या वस्तूंचे आम्ही काय करणार? त्याच वस्तूसणापूर्वी मिळाल्या असत्या तर नक्कीच आनंद होता. आत किती वाट पाहावी लागणार, माहित नाही.
- धर्मा नाईक, लाभार्थ
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.