Gulabrao Patil
Gulabrao PatilAgrowon

Gulabrao Patil : ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर मार्गी लागणार : गुलाबराव पाटील

Sugarcane worker : ‘ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
Published on

Parbhani News : साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून बंजारा समाज या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक आहे. गेल्या वर्षभरात बंजारा समाजातील ३५२ ऊसतोड कामगारांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना आर्थिक आधार मिळावा यासाठी जीवनविमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील गोदावरी तांडा (ता.गंगाखेड) येथे सोमवारी (ता.१६) आयोजित गोर सेनेतर्फे आयोजित ऊसतोड कामगार महामेळाव्यात पाटील बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, कर्नाटक गोरसेनेचे रविकांत बागडी, गोदावरी तांडाचे सरपंच नामदेव पवार आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil
Sugarcane FRP : ऊस आंदोलनाची पडली ठिणगी! शेतकरी संघटनेने सांगलीत रोखली साखर वाहतूक

पाटील म्हणाले,‘‘ऊसतोड कामगार हा साखरनिर्मिती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असून ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. इतर कामगारांप्रमाणे ऊसतोड कामगारांना मध्यान्ह भोजन मिळावे. त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ न मिळाल्यास स्वाधार योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.’’

Gulabrao Patil
Sugarcane Labor Shortage : यंदा ऊसतोडीसाठी मजूर टंचाईची शक्यता कमी

राठोड म्हणाले, ‘‘अनेक ऊसतोड कामगारांचे सर्पदंशाने मृत्यू होतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यांच्या वारसांना मदत मिळवून देणे. गरोदर ऊसतोड कामगारांना ६ महिन्यांचे वेतन देणे यांसह कामगारांना ओळखपत्र देणे तसेच कामगार विभागामध्ये नोंदणी करून त्यांना इतर कामगारांप्रमाणे सर्व शासकीय योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत,’’ असेही पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com