Private Travel Bus : दिवाळीत ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीला चाप

Diwali Festival : प्रकाशपर्वाचा दिवाळी सण अवघ्‍या पाच दिवसांवर आला असून नोकरदारांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. या संधीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आगाऊ भाडेवाढ करून प्रवाशांचे ‘दिवाळे’ काढतात.
Private Buses
Private BusesAgrowon

Panvel News : प्रकाशपर्वाचा दिवाळी सण अवघ्‍या पाच दिवसांवर आला असून नोकरदारांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. या संधीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आगाऊ भाडेवाढ करून प्रवाशांचे ‘दिवाळे’ काढतात. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ ने ३१ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केले होते.

त्‍याची दखल घेत खासगी वाहतूकदारांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उत्‍सवादरम्‍यान तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. कुठेही भाडेवाढीसह वाहतूक नियमांचा भंग झाल्याचे आढळल्‍यास, कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

Private Buses
Crop Nutrition : पिकांचे पोषण, वाढीसाठी सूक्ष्मजीवांचे कार्य व महत्त्व

पिकांचे पोषण, वाढीसाठी सूक्ष्मजीवांचे कार्य व महत्त्वमुंबई व पुणे येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या मोजक्याच बसगाड्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी पसंती देतात. गणेशोत्सवात कोकणातील नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. त्याचप्रमाणे पनवेल, वाशी, ठाणे, कल्याण, पालघर, मुंबईसह महानगरांत काम करणारे लोक दिवाळीसाठी आपल्या गावात जातात.

Private Buses
Sugarcane Season : शंभर साखर कारखान्यांना मिळाले गाळप परवाने

मुंबई येथून मूळगावी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दिवाळी अवघ्‍या काही दिवसांवर आल्‍याने गावी जाणाऱ्यांची लगबग वाढली आहे. सध्या मुंबई व उपनगरातून ट्रॅव्हल्स हाऊसफुल येत असल्याची माहिती सातारा, सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर वीरकर यांनी दिली.

दिवाळीनंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्‍स बस आताच हाऊसफुल झाल्‍या आहेत. दिवाळीत अधिकाधिक कमाई करण्यासाठी खासगी वाहतूकदारांकडून अवाच्या सवा भाडेवाढ केली जाते. दरवर्षी वाढणाऱ्या तक्रारीची दखल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतली असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्‍यास कारवाई होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com