Prime Minister Modi : 'सध्या शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा वाढीव एमएसपी दिली जाते' : पंतप्रधान मोदी

Delhi Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियानाचे शेतकरी आंदोलन करत आहे. सध्या देशाच्या विविध भागात 'रेल्वे रोको' आंदोलन केले जात आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपीवर मोठे वक्तव्य केलं आहे.
Prime Minister Modi
Prime Minister ModiAgrowon

Pune News : ६ मार्चला 'दिल्ली चलो'चा नारा दिल्यानंतर आज रविवारी (ता.१०) देशभरात 'रेल्वे रोको' आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरू झाले आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपीवर वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी, आज शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एमएसपीत पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढ करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केले.

हमीभाव कायद्यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी २७ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज याच मागणीसाठी देशभर रेल्वे रोको आंदोलन केले जात आहे. यामुळे देशाच्या विविध ठिकाणी रेल्वे गाड्या रोखल्या जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपीवर भाष्य केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, आज शेतकऱ्यांना एमएसपी दिला जात तो पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एमएसपीत यंदा ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.

Prime Minister Modi
Prime Minister Narendra Modi : मागील १० वर्षात आम्ही देशाचा नवा पाया घातला : पंतप्रधान मोदी

पुढे पीएम मोदी म्हणाले की, उसाच्या एमएसपीवर यंदा ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हजारो कोटींची थकबाकी भाजप सरकारने माफ केली आहे. यामुळे आता उसाचा किफायतशीर भाव ३१५ रुपयांवरून ३४० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.

तर उत्तर प्रदेशात सरकार चालवणाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसे रडवले होते, हे तुम्हाला आठवते का असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना केला आहे. तसेच तत्कालिन राजकर्त्यांच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पैसा एकतर वाया गेला किंवा अजिबात त्यांना तो मिळाला नाही. याच भाजप सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हजारो कोटींची थकबाकी माफ केली आहे. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य वेळी उसाला भाव मिळत आहे.

Prime Minister Modi
Farmers protest : शेतकऱ्यांचं आज देशव्यापी 'रेल्वे रोको' आंदोलन

एमएसपी म्हणजे काय?

एमएसपी (Minimum Support Price) म्हणजे किमान आधारभूत किंमत किंवा हमीभाव होय. तर बाजारातील पिकांच्या किंमतीतील चढ-उतारामुळे शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे हे एमएसपीचे उद्दिष्ट आहे. एमएसपी ही पीक विक्रीसाठी एक प्रकारची हमी किंमत असते. एमएसपीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळावा हे पाहिले जाते.

कोणत्या पिकांवर एमएसपी

कृषी मंत्रालयाच्या निर्देशानुसार खरीप, रब्बी हंगाम आणि इतर हंगामातील पिके तसेच व्यावसायिक पिकांवर एमएसपी लागू आहे. सध्या देशातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या सुमारे २३ पिकांवर एमएसपी लागू करण्यात आला आहे. गहू, भात (धान), हरभरा, भुईमूग, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, मूग, मसूर, तीळ आणि कापूस या पिकांवर एमएसपी लागू आहे. तर २०२४-२५ मधील रब्बी हंगामातील गव्हासाठी एमएसपी २२७५ रुपये प्रति क्विंटल आणि मोहरीची एमएसपी ५६५० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.

हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांवर ठाम

दिल्लीच्या सीमेवर १३ फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तर शेतकऱ्यांची मागणी ही सर्व पिकांचा समावेश एमएसपी करावा अशी आहे. तसेच १८ फेब्रुवारीला सरकारने सरकारी संस्था शेतकऱ्यांकडून पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करतील असा प्रस्ताव दिला होता. मात्र, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तसेच स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेल्या "सी २ प्लस ५० टक्के" फॉर्म्युला अंतर्गत सर्व पिकांवर एमएसपीची मागणी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com