Prime Minister Narendra Modi : 'ही पाच वर्षे देशातील सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाची' : पंतप्रधान मोदी

Budget Session of Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यावरून आज मोदी यांनी संसदेत भाषण केले. यावेळी त्यांनी अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असे ते म्हणाले.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiAgrowon

Pune News : देशातील १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ हा संपणार आहे. तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शनिवार (१० रोजी) शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राम मंदिराबाबत आभारप्रस्ताव मांडला. त्यांनी आपल्या भाषणात देशात सुधारणा, परफॉर्म आणि परिवर्तन फार कमी वेळा पाहायला मिळाले. पण आपल्या कार्यकाळात हे झाले. तर परिवर्तन हे पुढील काळात पाहण्यास आपण सक्षम आहोत. सुधारणा आणि परफॉर्म हा देश १७ व्या लोकसभेपासूनच अनुभव आहे. यामुळे देशवाशीय आपल्याला आशीर्वाद देत राहील असे मोदी यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी, सभागृह नेते आणि सहकारी खासदारांचे आभार मानले. तसेच अध्यक्ष ओम बिर्ला यांचे देखील आभार मानत ते सदा हसतमुख असतात असे गौरद्गार त्यांनी काढले आहेत. तसेच अध्यक्ष बिर्ला यांनी प्रत्येक परिस्थिती संयमाने हाताळली असेही ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi : आमच्या मोदी ३.० टर्मचा देशातील कोट्यवधी जनतेला फायदा होईल

तसेच कोरोना काळात खासदारांनी भत्ते सोडले होते. त्यावरूनही त्यांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले. तसेच ते म्हणाले, प्रसारमाध्यमांमध्ये सहसा खासदारांना मिळणाऱ्या मानधनावरून टीका केली जात होती. मात्र कोरोनाच्या काळात देशातील जनतेला संदेश देत खासदारांनी आपल्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एमपी कॅन्टीन सर्वांसाठी खुले करत चेष्टा करणाऱ्यांना रोखले.

तसेच संसदेची नवीन इमारतीवर सतत सर्वांनी एकत्रित चर्चा केली. पण निर्णय झाला नाही. आता त्यावर निर्णय झाला आणि संसदेची नवी इमारत मिळाली. संसदेच्या नवीन इमारतीत, वारशाचा एक भाग आणि स्वातंत्र्याचा पहिला क्षण जिवंत ठेवण्यासाठी, सेंगोल नेहमीच मार्गदर्शक ठरेल असेही मोदी यांनी म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi : इतिहासाचे जड झाले ओझे!

दरम्यान भारताला G20 चे अध्यक्षपद मिळाले. यामुळे भारताला जगभरात खूप मान मिळाला. यात प्रत्येक राज्याने आपापल्या परीने आपली ओळख जगासमोर मांडली. याचा परिणाम हा जागतिक पटलावर आज दिसून येतो, असेही मोदी म्हणाले.

यावेळी पीएम मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येकाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची सवय झाली आहे. याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे. संयुक्त प्रयत्नांमुळेच १७व्या लोकसभेची उत्पादकता जवळपास ९७ टक्के झाली आहे. ही आनंदाची बाब आहे. याबरोबरच १७ व्या लोकसभेच्या समाप्तीकडे वाटचाल करत असताना आपण नक्कीच १८ लोकसभेची सुरुवात १०० टक्क्यांहून अधिक उत्पादकता क्षमतेने करू, असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.

तसेच त्यांनी नवीन सदनाची भव्यता सांगताना, संसदेची सुरुवात भारताच्या मूलभूत मूल्यांवर भर देणाऱ्या कामाने झाल्याचे सांगितले. या नव्या भवनात नारी शक्ती वंदन कायदा झाला. तसेच जेंव्हा नारी शक्ती वंदन कायद्याचा उल्लेख होईल तेंव्हा नव्या सभागृहाच्या पावित्र्याची जाणीव होईल. जी आपल्याला नवे बळ देणारे असेल असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com