Prime Minister Narendra Modi : आमच्या मोदी ३.० टर्मचा देशातील कोट्यवधी जनतेला फायदा होईल

Narendra Modi On Congress : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बुधवारी (७ रोजी) उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना, आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला आहे आणि आम्ही ४०० जागा जिंकू असे म्हटले आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी (७ रोजी) राज्यसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आभार मानणारा प्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला आणि माझी स्वप्ने स्वतंत्र आहेत.

काँग्रेसने फक्त आरोप केले आहेत. त्यांनी, बीएसएनएल आणि एमटीएनएलचा नाश केला असे म्हटले होते. पण यांचा नाश कोणी केला हे मला त्यांना विचारायचे आहे? त्यांनी एचएएल आणि एअर इंडियाचे काय केले?

ज्या बीएसएनएलला काँग्रेसने उद्ध्वस्त केले ते आज मेड इन इंडिया ४G आणि ५G कडे वाटचाल करत आहे. HAL विक्रमी कमाई करत असून आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना बनला आहे. LIC चे शेअर्स विक्रम मोडत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात भारताची क्षमता, सामर्थ्य आणि उज्ज्वल भविष्याबद्दल सांगितल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी मोदींनी, दिल्लीतून जेव्हा एक रुपया निघतो आणि १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचतात हे काँग्रेसच्याच पंतप्रधानांनी सांगितले होते असे म्हटले आहे.

तसेच काँग्रेसवाल्यांना आजार माहीत होते, पण त्यांना अरोग्यात सुधारणा आणण्याची तयारी नव्हती. काँग्रेसचा १० वर्षांचा इतिहास बघा. ज्यात धोरणात्मक विरोधाभास ही त्यांची ओळख बनली आहे. पण आमचा १० वर्षांच्या कार्यकाळ हा देशाची टॉप ५ अर्थव्यवस्था आणि मोठ्या निर्णयांसाठी लक्षात राहते असे मोदी यांनी म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi : इतिहासाचे जड झाले ओझे!

तसेच आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी या चार मोठ्या जातींना संबोधित केले होते. त्यांचे प्रश्नही तेच आहेत, त्यांची स्वप्नेही तीच आहेत आणि ते सोडवण्याचे मार्गही तेच आहेत, म्हणूनच हे चार स्तंभ मजबूत करा. मगच देश विकसित भारताकडे वाटचाल करेल असे मोदी यांनी आवाहन केले.

तर २१ व्या शतकात विकसित भारतासाठी २० व्या शतकातील विचार कार्य करू शकत नाही. मी आणि माझं हा स्वार्थी अजेंडा चालणार नाही असेही त्यांनी ठणकावले आहे. तर काँग्रेसला मुळातच दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींशी वैर होते. जर बाबासाहेब नसते तर SC-ST ला आरक्षण मिळाले असते की नाही हे ही माहीत नाही असाही घणाघात त्यांनी काँग्रेसवर केला.

त्याबरोबरच त्यांनी, LIC संबंधी काँग्रेसच्या विधानांचा समाचार घेताना, एखाद्याला बरबाद करण्याचा, अफवा पसरवण्याचा हा फक्त मार्ग आहे असे म्हटले आहे. पण आज आज एलआयसीचे शेअर्स विक्रमी पातळीवर आहेत.

PSU बंद झाली असाही अपप्रचार केला गेला. मात्र २०१४ साली जो PSU २३४ होता तो आज २५४ आहे. तर १० वर्षांपूर्वी PSU चा निव्वळ नफा सुमारे १.२५ लाख कोटी रुपये होता. त्याच PSU चा १० वर्षानंतर निव्वळ नफा हा २.५ लाख कोटी रुपये आहे. पण जेथे काँग्रेसवाल्यांचा हाथ लागतो ते बुडणार हे निश्चित असेही मोदी म्हणाले.

देशातील २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढल्याचे ते म्हणाले. तसेच काँग्रेसच्या ८० कोटी जनतेला अन्न का दिले जाते यावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, आजारी व्यक्ती हॉस्पिटलमधून बाहेर पडताना काही काळ खाण्यापिण्याची काळजी घ्या असे डॉक्टर सांगतात. त्यामुळेच गरीबीतून बाहेर पडताना नवीन मध्यमवर्गाकडे अधिक लक्ष दिले जात आहे. आम्ही धान्य देत आहे आणि देत राहू असेही ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi
Prime Minister's Micro Irrigation Scheme : तुषार, ठिबक संचांचे अर्ज ‘महाडीबीटी’ स्वीकारेना

तर मोदी की गॅरेंटी वर बोलताना ते म्हणाले, ही मोदीची खात्री की, भविष्यातही गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंतची सुविधा मिळत राहील. ८० टक्के सवलतीत औषधे मिळतील आणि ही माझी हमी आहे.

तर विकासाच्या प्रवासात शेतकरी ताकदीने सामील व्हावेत यासाठी त्यांना सन्मान निधी मिळत राहील, याचीही हमी मोदींनी यावेळी दिली. तर पक्की घरे व नळपाणी योजना देण्याचा उपक्रम सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले. तर आमच्या सरकारची तिसरी टर्म ही काही दूर नसून मोदी ३.० ही विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी असेल असेही मोदी म्हणाले.

तसेच येत्या ५ वर्षांत देशात डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालये वाढतील. उपचार स्वस्त आणि सुलभ होतील. देशातील तरुण स्टार्टअप, युनिकॉर्न, लाखोंच्या संख्येत जातील. टियर टू, टियर थ्री शहरे स्टार्टअप्सच्या ओळखीसह उदयास येतील.

विक्रमी पेटंट दाखल करण्याचे दिवस लवकरच येतील असेही आहे. मेड इन इंडिया सेमी कंडक्टर येत्या ५ वर्षांत ओळख निर्माण करतील. देशाला इलेक्ट्रिक मार्केटमध्ये नवीन गतीची क्षमता दिसेल. लाखो, करोडो रुपयांचे तेल आयात करून ऊर्जा निर्मिती करून आपण स्वावलंबी होऊ असेही ते म्हणाले.

तर हा शब्दांचा खेळ नाही, ही आमची बांधिलकी आहे. आपला प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण हा देशाला समर्पित आहे. याच भावनेने आम्ही पुढे जात आहोत आणि पुढेही जात राहू. येणारी शतके इतिहासात सुवर्णकाळ नोंदवतील. देशातील जनतेची मनस्थिती मला समजते. देशाने १० वर्षात बदल पाहिला आहे असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com