PM Modi Visit to Maharashtra : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

PM Modi Visit to Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. २८) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते यवतमाळ येथे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता जमा करण्यासह महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon

PM Narendra Modi Yavatmal Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता.२८) महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत.

यादरम्यान पंतप्रधान कोट्यवधी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन करतील. तसेच ते पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता जमा करतील. त्याचबरोबर यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

भारी शिवारात ४७ एकर परिसरात सभामंडप उभारण्यात आला आहे. दुपारी ४ पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. यासभेला जिल्ह्यातील महिला बचत गटातील जवळपास दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृतिस्थळासह वर्धा-कळंब रेल्वेचे लोकार्पण करणार आहेत.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे चार हजार रूपये आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

सध्या राज्यातील या दोन्ही योजनेसाठी सुमारे ८८ लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. तर पंतप्रधान नमो शेतकरी महासम्मान निधीचा सुमारे ३८०० कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. 

PM Narendra Modi
PM Modi : डॉ. मनमोहन सिंग यांचे कार्य न विसरता येणारे : पंतप्रधान मोदी

महिला बचत गटांना 'फिरता निधी'

राज्यातील ५.५ लाख महिला बचत गटांना फिरता निधी' वितरित केला जाणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) अंतर्गत भारत सरकारने प्रदान केलेल्या निधीव्यतिरिक्त ८२५ कोटी रुपयांचा निधी  दिला जाणार आहे. 

PM Narendra Modi
PM Narendra Modi : 'आमचा राम आला, तो तंबूत नाही तर दिव्य मंदिरात राहणार' : प्रधानमंत्री मोदी

मोदी आवास घरकुल योजना

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एक कोटी आयुष्मान कार्ड वितरित केले जाणार असून ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 'मोदी आवास घरकुल योजना' सुरू केली जाणार आहे. या घरकुल योजनेतून २०२३-२४ ते २०२५-२६ या दरम्यान १० लाख घरे बांधण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन

राज्यातील १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन बुधवार करण्यात येणार आहे. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज लाइन, नवीन आष्टी-अमळनेर ब्रॉडगेज लाइन या प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com