Kharif Paisewari : नजरअंदाज पैसेवारी ५० पेक्षा अधिक

Kharif Season : खरीप हंगाम २०२४-२५ मधील नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली आहे. अकोला जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी आलेली असून दुसरीकडे बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांमध्ये हीच पैसेवारी ५० पेक्षा अधिक निघालेली आहे.
Kharif News
Kharif NewsAgrowon
Published on
Updated on

Akola News : खरीप हंगाम २०२४-२५ मधील नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाली आहे. अकोला जिल्ह्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी आलेली असून दुसरीकडे बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांमध्ये हीच पैसेवारी ५० पेक्षा अधिक निघालेली आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांची उत्पादकता ३० ते ४० टक्के घटलेली असतानाही ही पैसेवारी वाढीव आल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.

बुलडाण्यात १३४७ गावे ५० पैशांवर

या खरिपात जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. जाहीर झालेल्या पीक पैसेवारीनुसार जिल्ह्यातील १३४७ गावांची नजरअंदाज पीक पैसेवारी ५० पैशांवर तर ७३ गावांची नजरअंदाज पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.

Kharif News
Kharif Paisewari : जत तालुक्यातील ४६ गावांतील पैसेवारी पन्नास टक्क्यांहून अधिक

जिल्ह्यातील १३ पैकी एकमेव शेगाव तालुक्यातील ७३ गावांची पैसेवारी ५० च्या आत आली आहे. बुलडाणा तालुक्यातील ९८ गावांची अंतिम पीक पैसेवारी ७२, चिखली तालुक्यात १४४ गावांची पैसेवारी ७०, देऊळगाव राजा ६४ गावांची पैसेवारी ७२, मेहकर १६१ गावांची पैसेवारी ७२, लोणार ९१ गावांची पैसेवारी ६२, सिंदखेड राजा ११४ गावांची पैसेवारी ६८, मलकापूर ७३ गावांची पैसेवारी ६७, मोताळा १२० गावांची पैसेवारी ६१, नांदुरा ११२ गावांची पैसेवारी ६५, खामगांव १४६ गावांची पैसेवारी ५३, जळगांव जामोद ११९ गावांची पैसेवारी ५५ पैसे आणि संग्रामपूर १०५ गावांची अंतिम पीक पैसेवारी ७३ आहे. तर ५० पैशांपेक्षा कमी शेगांवमधील ७३ गावांची ४७ पैसेवारी जाहीर झाली आहे.

Kharif News
Kharif Paisewari : नांदेडला खरिपाची अंतिम पैसेवारी ४७.८७ पैसे जाहीर

वाशीममध्ये ६० पैशांपेक्षा पैसेवारी

महसूल प्रशासनाने राज्य शासनाला पाठवलेल्या खरीप पिकांच्या नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात वाशीम जिल्ह्यातील ७९३ गावांची पैसेवारी ६४ पैशांपेक्षा अधिक दर्शविली आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यावर्षी ८९७.१० मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

जिल्हयात अनेकवेळा अतिवृष्टी झाली. त्याचा खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रत्येक तालुक्यातून झालेली आहे. अशातच ही पैसेवारी पीकपरिस्थिती समाधानकारक असल्याचे दर्शवीत आहे.

आता अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने काढलेल्या नजरअंदाज पैसेवारीत वाशीम ६७, मालेगाव ५९, रिसोड ६३, मंगरूळपीर ६४, मानोरा ६३, कारंजा ६६ अशी पैसेवारी दर्शविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com