Rahibai Popere : रानभाज्यांचे महोत्सव भरवावेत ः राहिबाई पोपेरे

Wild Vegetables : डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आहेत. त्या रानभाज्या औषधी असून आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाच्या आहेत. त्याचा अवलंब दैनदिन आहारात केला पाहिजे.
Rahibai Popere
Wild Vegetable FestivalAgrowon
Published on
Updated on

Pune News : डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आहेत. त्या रानभाज्या औषधी असून आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाच्या आहेत. त्याचा अवलंब दैनदिन आहारात केला पाहिजे. त्यासाठी रानभाज्याचे मेळावे भरविले पाहिजे. त्यातून भाज्यांचे महत्त्व वाढीस लागणार असून त्या महोत्सवाच्या माध्यमातून वाचविल्या पाहिजे, असे आवाहन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटातील महिलांचा स्नेह मेळावा व गौरव समांरभाचे आयोजन बुधवारी (ता. १२) बँकेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे केले होते.

त्या वेळी पद्मश्री पोपेरे या बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, व्हाइस चेअरमन सुनील चांदेरे, व्हॅम्निकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव, नाबार्डच्या सहायक व्यवस्थापक स्मृती भगत, केंद्र सरकारच्या निधीसंकलन आणि भागीदारी, स्वयं, शिक्षण प्रयोगाच्या संचालक डॉ. मंजुषा कदम, बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, पूजा बुट्टेपाटील, संचालक प्रवीण शिंदे, विकास दांगट, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.

पद्मश्री पोपेरे म्हणाल्या, ‘‘मागील काही वर्षांत हायब्रीड अन्नधान्याचे उत्पादन वाढत असल्याने त्यातून विविध आजार बळावत असल्याचे समोर आले. त्या वेळी गावरान बियाण्यांचा वापर करून शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी कुटुंबातील अनेकांनी नावे ठेवली होती. परंतु कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडल्यानंतर गावरान अन्नधान्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर देशी बियाण्यांसाठी पाठिंबा देण्यात आला.

आजही आमच्या भागातील शेतकरी गावठी अन्नधान्य खात आहेत. इतर ठिकाणी अनेक जण पैसे देऊन विष विकत घेत आहेत. त्यातून आजार वाढत असल्याने डॉक्टरचे घर भरण्याचे काम करत आहोत. त्यामुळे चांगली माती असेल तर चांगले अन्नधान्य मिळेल. त्यामुळे मातीचे आरोग्य जपण्याचे काम आपले असून तरच आपली पुढची पीढी चांगली राहणार आहे.’’

Rahibai Popere
Wild Vegetables : डोंगरी भागात रानभाज्यांना बहर, महिलांना मिळतोय आर्थिक आधार

देशी बियाण्यांची माहिती घेण्यासाठी अनेक विद्यार्थी, लोक आमच्याकडे येतात. त्याची माहिती घेऊन त्याची लागवड करतात. त्यामुळे देशी बियाण्यांचे महत्त्व वाढत आहे. मात्र, सध्या आपण शेतीत विष पेरत आहोत, त्यामुळे विषच आपल्याला मिळत असून तेच आपण खात आहोत. सर्वांनी आरोग्य जपले तरच पुढची पिढी वाचणार आहे. मी शिकलेली नसले तरी आरोग्यासाठी काम करत आहे. ते समाजात सर्वांत चांगले काम आहे. ते चांगल्या मातीमुळे शक्य झाले आहे. अन्न चांगले असेल तर आरोग्य चांगले राहणार आहे. त्यासाठी माती वाचविणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Rahibai Popere
Wild Vegetables : कोल्हापुरात रानभाज्यांचा खजिना, जोतिबा डोंगरावर ४७ हून अधिक औषधी रानभाज्या आढळल्या

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, ‘‘पद्मश्री राहिबाई पोपेरे या चालतेबोलते मुक्त विद्यापीठ आहेत. त्याच्याकडे बियाण्यांचा मोठा संग्रह आहे. पुढील काळात कृषी विद्यार्थी, शास्त्रज्ञ अभ्यास करून पीएचडी करतील, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीपासून ते आतापर्यंतचे अनुभव चांगल्या प्रकारे मांडले आहेत.

त्या खऱ्या अर्थाने महिलांच्या आयडॉल आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्वांनी गावठी देशी बियाणे वापरले पाहिजे. चांगली माती असेल, तर चांगली पैदास चांगली होते. त्यासाठी मातीचे आरोग्य जपले पाहिजे. महिलांनी ही एक संधी हाती घेऊन देशी बियाणे वापरले पाहिजे. तरच पुढच्या पिढीला चांगले अन्नधान्य मिळणार आहे.’’ पूजा बुट्टे पाटील यांनी प्रास्तविक केले. तर तृप्ती कांबळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com