Solapur News : केळीचे पीक निघाल्यानंतर राहिलेल्या बुंध्यापासून सीएनजी बायोगॅस तयार करण्याचे प्रयत्न सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे मत कळंब येथील नॅचरल उद्योग समूहाचे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी कंदर (ता. करमाळा) येथे केले.
कंदर येथील के. डी. एक्स्पोर्टच्या केळी पॅकहाउस आणि कोल्ड स्टोअरेजचे उद्घाटनप्रसंगी श्री. ठोंबरे बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख होते.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॅ. के. बी. पाटील, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, पणनचे माजी संचालक सुनील पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे, लोकविकास डेअरीचे चेअरमन दीपक देशमुख, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, नवनाथ भांगे, सरपंच मौला मुलाणी, उपसरपंच अमर भांगे, प्रकल्पाचे प्रमुख किरण डोके या वेळी उपस्थित होते.
श्री. ठोंबरे म्हणाले, की शेतकऱ्यांनी पिकलेला शेतीमाल विकण्याबरोबर बाजारात जे विकते, ते पिकवण्यावर आणि उत्पादित शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्यावर भर दिला पाहिजे. करमाळा तालुक्यात केळी पिकासाठी मोठा वाव असून, यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे सांगितले.
माजी कुलगुरू डॉ. देशमुख म्हणाले, की ज्वारी पिकवणारा सोलापूर जिल्हा सूर्यफूल, बोर, डाळिंब, ऊस असा प्रवास करत सध्या केळीच्या उत्पादनात अग्रेसर ठरत असून, तो कायम अग्रेसर राहण्यासाठी निर्यातक्षम उत्पादनाबरोबर काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, असे सांगितले.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीच्या गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी फ्रूटकेअर मॅनेजमेंट सांभाळण्याची गरज व्यक्त केली. प्रास्ताविक के. डी. एक्स्पोर्टचे प्रमुख किरण डोके यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.