Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Turmeric Farming : हळद हे कधी काळी खानदेशातील पीक होईल, असे वाटत नव्हते. मात्र, आता खानदेशात हळद लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.
Turmeric Cultivation Preparation
Turmeric Cultivation PreparationAgrowon

Turmeric Update In Jalgaon : हळद हे कधी काळी खानदेशातील पीक होईल, असे वाटत नव्हते. मात्र, आता खानदेशात हळद लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे.

सध्या बियाणे (बेणे) निवड सुरू असून साधारणतः मे महिन्याच्या अखेर त्याची लागवड होईल, असे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यादृष्टीने हळद लागवडीची पूर्वतयारी सुरु झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून चोपडा, रावेर, शहादा, चाळीसगाव, यावल, शिरपूर, शिंदखेडा आदी भागात हळद पीक वाढू लागले आहे. खरिपाच्या सुरुवातीला

लागवड होणाऱ्या हळद पिकाच्या बियाण्याची पूर्व तयारी करण्याची लगबग या सर्व भागात सध्या सुरु झाली आहे. त्यासाठीचे बॉयलर आणि अन्य यंत्रसामुग्री अनेक शेतकऱ्यांनी घेतली असून पीक घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून अनेक भागातील शेतकरी आणि त्यांच्या गटांनी हळद पावडर विक्री करणेही सुरू केले आहे.

Turmeric Cultivation Preparation
Turmeric Cultivation : सांगलीत हळद लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता

गट्टू आणि फिंगर बियाणे

सर्वसाधारणपणे हळदीचे बियाणे दोन प्रकारचे वापरतात. गट्टू बियाणे थोडेसे गोल स्वरूपातील असते व त्याच्या लागवडीतून अधिक उत्पादनाची अपेक्षा केली जाते. तर फिंगर लागवडीत थोडे उत्पादन कमी येते. एकरी बियाणे गट्टू १२ क्विंटल तर फिंगर ७ क्विंटल लागते.

हळद पिकवून ती बॉयलर केली जाते. १०० क्विंटलपासून साधारणतः २० ते २२ क्विंटल हळद मिळते. जी सांगली बाजारात विक्री केली जाते. खानदेशात जवळपास ५ हजार एकर क्षेत्रावर हळद घेतली जाते. यंदा रावेर तालुक्यात हळद लागवडीकडे सर्वाधिक कल दिसून येत आहे.

हळदीचे गुणधर्म

आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.

हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून पितात. डोळ्यांच्या विकारासह त्वचारोगावरही हळद प्रभावी ठरते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com