Turmeric Cultivation Update: सांगलीत हळद लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता

सांगली जिल्ह्यात अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीस प्रारंभ होतो. नवीन शेतकरी देखील हळद लागवडीसाठी पुढे येतात.
Turmeric Cultivation
Turmeric CultivationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीस प्रारंभ होतो. नवीन शेतकरी देखील हळद लागवडीसाठी पुढे येतात. बाजार समितीसह कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्रातून हळद बियाणे खरेदी करतात.

अक्षय तृतीयेपासून हळद लागवडीचा शेतकऱ्यांनी मुहूर्त केला असला तरी, गेल्या १२ दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे हळद लागवड लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मशागत पूर्ण केली आहे. शेतकरी हळद लागवडीसाठी तयारी करु लागले आहेत. काही ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीची लागवड देखील झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी १०५६ हेक्टर हळदीचे क्षेत्र होते.

जिल्ह्यातील वाळवा, पलुस, मिरज तालुक्यांत प्रामुख्याने हळदीची लागवड होते. कृष्णा आणि वारणा काठ सोडून आता दुष्काळी पट्ट्यातही हळदीची लागवड काही प्रमाणात वाढली आहे. पूर्वीपासून हळदीचे पीक घेणारे शेतकरी पुढच्या हंगामासाठी घरातच हळदीचे बियाणे तयार करतात. त्यामुळे त्यांना बियाण्यांची कोणतीही अडचण येत नाही.

Turmeric Cultivation
Chana, Soybean Market : मका, हळद, हरभरा, सोयाबीनमध्ये उतरता कल

६५ टक्के बियाण्यांची विक्री

दरम्यान, कसबेडिग्रज येथील हळद संशोधन केंद्रात देखील बियाणे तयार केले जाते. यंदाच्या हंगामात मातृगड्डा १०० क्विंटल तर हळकुंडे ५०० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी ६५ टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे. यामध्ये मातृकंद ३५०० रुपये प्रतिक्विंटल तर हळकुंड ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे.

हळद संशोधन केंद्रात दरवर्षी हळदीचे बियाणे तयार केले जाते. यंदाच्या हंगामासाठी ६०० क्विंटल इतके बियाणे होते. त्यापैकी ६५ टक्के बियाण्यांची विक्री झाली आहे. सध्या हळद लागवडीसाठी पोषक असे वातावरण नाही.
डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com