Sugarcane Harvesting : यंत्राने ऊस तोडीला प्राधान्य

Sugarcane Season 2024 : ऊस पट्टा अशी ओळख असणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस हंगाम गती घेत असताना यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तोडी सुरू आहेत.
Sugarcane Harvesting
Sugarcane Harvesting Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ऊस पट्टा अशी ओळख असणाऱ्या शिरोळ तालुक्यात ऊस हंगाम गती घेत असताना यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तोडी सुरू आहेत. या वर्षी गरजेप्रमाणे ऊस तोड मजुरांच्या टोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत याचा परिणाम यंत्राच्या माध्यमातून ऊस तोडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातील कारखान्यांसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ऊस तोड असताना चाऱ्याची मात्र मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. तालुक्यात पिकणाऱ्या उसाच्या वाढ्यासाठी पशुपालकांना शेकडा वाढ्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत.

Sugarcane Harvesting
Sugarcane Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी धीम्या गतीने

पंधरा नोव्हेंबरपासून शासनाने राज्यातील गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे हा हंगाम जवळपास महिनाभर लांबल्यामुळे उसाला तुरे फुटले आहेत. परिणामी, उसाचे वजनदेखील घटले आहे.

अशा स्थितीत पशुपालकांना चांगल्या दर्जाचा हिरवागार चारा मिळणे मुश्कील झाले आहे. शिरोळ तालुक्यात निम्म्याहून अधिक ऊस पिकाची लागवड होते. हंगाम सुरू झाला की जनावरांना हिरवागार चारा उपलब्ध होत होता ही गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंतची परिस्थिती होती.

अलीकडच्या काळात यंत्राच्या साह्याने उसाची तोड होत असल्यामुळे ऊस पिकणाऱ्या शिरोळ तालुक्यात पशुपालकांवर हिरव्या चाऱ्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. तुरे फुटल्यामुळे उसाच्या वाड्याचे हिरवे गरळे मिळताना दिसत नाहीत. गेल्या काही वर्षांत ऊस टोळ्यांकडून वाहन धारकांची होणारी फसवणूक, कारखान्याची होणारी अडचण लक्षात घेऊन कारखानदारांनी देखील यंत्राच्या साह्याने ऊस तोडीला प्राधान्य दिले आहे.

Sugarcane Harvesting
Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

यंत्राच्या साह्याने दिवसभरात मोठ्या प्रमाणावर उसाची तोड होते. मात्र जनावरांना हिरवा चारा मिळू शकत नाही. ज्या ठिकाणी ऊसतोड मजूर आहेत त्या ठिकाणी चांगले वाढे मिळत नाही. चांगले वाढे मिळाले तर ते परवडणाऱ्या दरात मिळत नाही, अशा अनेक समस्या सध्या तालुक्यातील पशू मालकांना भेडसावत आहेत. सध्या कारखानदारांकडून आडसाली उसाची प्राधान्याने तोड सुरू आहे. खोडवा उसाची तोड आणखी दीड ते दोन महिने तरी शेतकऱ्यांना मिळणार नाही.

या काळात उसाचे वजन मोठ्या प्रमाणावर घटण्याची भीती आहे. थंडीमुळे हत्ती गवत, गवत या चाऱ्याची वाढ कमी प्रमाणात होते. परिणामी वाढ्याच्या हिरव्या चाऱ्याशिवाय दुसरा पर्याय पशुमालकांपुढे नाही. ऊस तोडीचा हंगाम सुरू असून देखील तालुक्यात हिरव्या चाऱ्यासाठी पशुपालकांना धावपळ करावी लागत आहे.

ऊस तोड हंगाम सुरू असून देखील जनावरांना हिरवा चारा मिळू शकत नाही. चांगला चारा मिळाला तरी त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत जनावरांना सांभाळणे मुश्कील बनले आहे. ऐन हंगामात देखील महागडे पशुखाद्य घालून जनावरांचा सांभाळ करावा लागत आहे.
- संदीप खामकर, पशुपालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com