Rain Crop Loss : पूर्वमोसमी पावसामुळे हिंगोलीत १८९ हेक्टरवर नुकसान

Heavy Rain Crop Damage : मे मधील पूर्वमोसमी पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on: 
Updated on: 

Hingoli News : यंदाच्या (२०२५) मे मध्ये झालेला पूर्वमोसमी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील ४५६ शेतकऱ्यांच्या बागायती, फळपिके मिळून एकूण १८९.७३ हेक्टर क्षेत्रावरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ५७ लाख ४८ हजार २१० रुपये निधीची मागणीकेली आहे. मे मधील पूर्वमोसमी पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Crop Damage
Crop Damage : सिंधुदुर्गात २६ हेक्टरवर नुकसान

हळद, भाजीपाला तसेच आंबा, केळी आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले. हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील १२०.२३ हेक्टरवरील बागायती पिकांचे तर हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यांतील ६९.५० हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे ७६३ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

सर्व बाधित शेतकरी ० ते २ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतील आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी बागायती पिकांच्या नुकसानीबद्दल ३२ लाख ४६ हजार २१० रुपये तर फळपिकांच्या नुकसानीबद्दल २५ लाख २ हजार रुपये मिळून एकूण ५७ लाख ४८ हजार २१० रुपये एवढ्या निधीची मागणी करण्यात आली आहे, असे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com