

Beed News : कडक उन्हामुळे घटत चाललेल्या जलसाठ्याने वाढविलेली पाण्याची चिंता पूर्वमोसमी पावसामुळे कमी झाली. मागच्या १६ दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नद्या, ओढे प्रवाहित झाल्याचा परिणाम तलावांतील पाणीसाठ्यावरही झाला आहे.
कोरडेठाक पडलेल्या २० तलावांत पाणी साठले असून, उर्वरित तलावांतील पातळीही वाढली आहे. पूर्वमोसमी पावसामुळे मोठ्या जलस्रोतांत तब्बल ४७ दलघमी पाणीसाठा वाढला आहे.
यंदाच्या मे महिन्यात आतापर्यंतच्या नजकीच्या इतिहासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या १६ दिवसांत जिल्ह्यात तब्बल २०८ मिलिमिटर पाऊस झाला आहे. मागच्या आठ दिवसांत जिल्ह्यात २६ मोठे तलाव कोरडेठाक पडले होते. आता ही संख्या केवळ सहा झाली आहे.
तर, ८.७५ टक्के (६७.३५५ दलघमी) असलेला पाणीसाठा १४.९० टक्के (११४.६९५ दलघमी) एवढा वाढला आहे. म्हणजेच आठवडाभरात जलसाठ्यात साधारण दुप्पट वाढ झाली आहे. १२ मेपासून पूर्वमोसमी पावसाची सुरवात झाली. सुरवातीला जोरदार वादळामुळे मोठे नुकसान झाले. आतापर्यत वीज पडून ६० जनावरे आणि चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत तालुका निहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
बीड २२३.३
पाटोदा २६२
आष्टी ३२४.६
गेवराई १७८
माजलगाव १३८.८
अंबाजोगाई १५५.९
केज २१२.५
परळी १३७.४
धारूर २३६.२
वडवणी ११३.५
शिरूर कासार १८९
एकूण २०८.२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.