Soil Preparation Techniques: अक्षय तृतीयेपासून खरिपाच्या कामांना पारंपरिक प्रारंभ होत असल्याने जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मृग नक्षत्र अवघ्या ४० दिवसांवर येऊन ठेपले असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे..मराठी नववर्षाच्या पाडव्याच्या दिवशी शेतकरी तास काढतात; मात्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेपासून प्रत्यक्ष शेतीकामांना सुरुवात केली जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती तसेच शेत साफसफाईची कामे हाती घेतली आहेत..Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू.सध्या तापमानात मोठी वाढ झाली असली तरी शेतकरी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मशागतीची कामे करत आहेत. मृग नक्षत्र जवळ येत असल्याने तसेच २५ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार असल्याने खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. विशेषतः हळद उत्पादक शेतकरी रोहिणी नक्षत्रात लागवडीची तयारी करत आहेत. .यांत्रिकीकरण आणि सिंचन सुविधेमुळे शेतीच्या पद्धतीत बदल झाला असला तरी ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक शेतकरी आजही बैलजोडीच्या साहाय्याने पारंपरिक पद्धतीने मशागत करताना दिसतात. त्याचबरोबर ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर आणि कुळव यांना देखील मोठी मागणी वाढली आहे. काही कामांसाठी मनुष्यबळाची गरज असल्याने मजुरांची मागणीही वाढत आहे..Paddy Plantation : भातलागवडीखालील क्षेत्रात घट.पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीची मशागत पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. वेळेत मशागत केल्यास तण व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे पेरणीची कामेही वेळेत पूर्ण होण्यास साहाय्य होते. दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, संतुलित खतांचा वापर, मृदा परीक्षण आणि हवामानानुसार पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. नियोजनबद्ध तयारी आणि वेळेत मशागत केल्यास यंदाच्या खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत..दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, संतुलित खतांचा वापर, मृदा परीक्षण आणि हवामानानुसार पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. नियोजनबद्ध तयारी आणि वेळेत मशागत केल्यास यंदाच्या खरीप हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.