Agriculture Science Center : परभणी ‘केव्हीके’तर्फे ११ गावांमध्ये खरीपपूर्व नियोजन अभियान

Kharif Season Management : परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे परभणी जिल्ह्यातील ११ गावांमध्ये पर्यावरणपूरक जीवनपद्धती अभियानअंतर्गत खरीपपूर्व नियोजन अभियान तसेच जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
Agriculture Science Center
Agriculture Science CenterAgrowon
Published on
Updated on

Parbhani KVK News : परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे परभणी जिल्ह्यातील ११ गावांमध्ये पर्यावरणपूरक जीवनपद्धती अभियानअंतर्गत खरीपपूर्व नियोजन अभियान तसेच जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगला, सनपुरी, साळापुरी, पेडगाव, एकरुखा, आळंद, जांब, सोन्ना, तरोडा (सर्व ता. परभणी) माक व कसर (ता. जिंतूर) या गावांमध्ये खरीपपूर्व नियोजन अभियान व जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

Agriculture Science Center
Agricultural Drone : कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथे ड्रोनचे प्रशिक्षण

पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. अमोल काकडे, पीकशास्त्र विषय विशेषज्ञ सवाई सिंग निठरवाल, मृदा विज्ञान प्रयोगशाळा तज्ज्ञ सी. आर. देशमुख आदी यामध्ये सहभागी झाले होते.

पेडगाव येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. काकडे म्हणाले, की खरीप हंगामात विविध पिकांवर शंखी गोगलगाय, मिलीपीड (पैसा), हुमणी अळी, शेंदरी बोंड अळीचे व्यवस्थापन व नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करावे.

निठारवाल म्हणाले, की पेरणीपूर्व मशागत, बियाणे व वाणांची निवड, बीजप्रक्रिया, तण व पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, यांत्रिक पद्धतीचा वापर, बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा.

देशमुख म्हणाले, की माती परीक्षणावर आधारित खताचे व्यवस्थापन करावे. या वेळी मातीचा नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. या अभियानामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com