
Pune News : पुणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे तत्काळ निराकारण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत पाऊले उचलण्यात येत आहेत. प्रत्येक आगारामध्ये आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे विभागात सोमवारपासून (ता. १५) हा प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसमधून सरासरी ५४ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा दिली जाते. त्यासाठी एसटीचे ९० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी अहोरात्र काम करतात. प्रवाशांना एस बसस्थानक, बस स्थांनकावरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जुंतक आणि टापटीप असावीत. तसेच सर्व एस बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात.
ठरलेले थांबे घ्यावेत, चालक वाहकांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांची असते. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी समस्या आणि तक्रारींचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी हा प्रवासी राजा दिन आयोजित केला असून, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालये त्यांच्या लेखी सूचना, तक्रारी मांडू शकतात. त्यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार असून, तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
कोणत्या आगारात कधी?
इंदापूर (१५ जुलै), तळेगाव (१९ जुलै), राजगुरूनगर (२२ जुलै), पिंपरी-चिंचवड (२६ जुलै), मंचर (२९ जुलै), शिवाजीनगर (२ ऑगस्ट), शिरूर (५ ऑगस्ट), भोर (९ ऑगस्ट), दौंड (१२ ऑगस्ट), स्वारगेट (१६ ऑगस्ट), नारायणगाव (१९ ऑगस्ट), बारामती शहर आणि बारामती एमआयडीसी (२३ ऑगस्ट), सासवड (२६ ऑगस्ट).
- स्थानकावर प्रवासी राजा दिन सूचना फलक लावावेत, ध्वनिक्षेपकावरून माहिती द्यावी
- प्रवाशांच्या तक्रारी लेखी, निवेदन स्वीकारून त्याची नोंदवहीत नोंद ठेवावी
- तक्रारदारांची संपूर्ण माहिती (नाव, पत्ता, संपर्क क्रमांक) घ्यावी
- विभाग नियंत्रक यांचे वेळापत्रक बसस्थानकाच्या दर्शनी भागात लावावे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.