Electricity Connection : मराठवाड्यात वर्षभरात सव्वा लाख नवीन वीज जोडण्या

New Power Connection : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत सर्व वर्गवारीतील १ लाख २४८४८ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत सर्व वर्गवारीतील १ लाख २४८४८ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

नवीन वीज जोडणीसाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह ‘महावितरण’च्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण कंपनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

Electricity
Electricity Theft : मराठवाड्यात २३ कोटी ७८ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडल्या

त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने यांनी नव्या वीज जोडणीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

Electricity
Electricity Tariff : देशभरातील वीजदर कमी होण्याची शक्यता

ग्राहकांनी नव्या वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी स्थळ अर्थात जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात.

मंडल कार्यालय नवीन जोडण्या

छत्रपती संभाजीनगर शहर १३,६७४

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण २२,५१८

जालना १४,१८४

छत्रपती संभाजीनगर परिमंडल ५०,३७६

बीड १२,३९५

धाराशिव ११,७०७

लातूर २०,७९७

लातूर परिमंडल ४४,८९९

हिगोंली ४,५४१

नांदेड १९,९५५

परभणी ५,०७५

नांदेड परिमंडल २९,५७१

मराठवाडा एकूण १,२४,८४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com