Betel Leaf Processing : विड्याच्या पानांपासून पावडर आणि चॉकलेट

Betel Leaf : विड्याच्या पानामध्ये प्रथिने, स्निग्धपदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल इत्यादी घटक मुबलक प्रमाणामध्ये आढळतात.
Betel Leaf
Betel Leaf Agrowon

व्ही. आर. चव्हाण,डॉ. एन. आर. चव्हाण

Betel Leaf Food Processing : विड्याच्या पानामध्ये प्रथिने, स्निग्धपदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल इत्यादी घटक मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. बद्धकोष्ठता, श्वासाची दुर्गंधी, डोकेदुखी, खाज, स्तनदाह, दाद, हिरड्यांची सूज, संधिवात इत्यादी आजार बरे करण्यास पानातील पोषणद्रव्ये मदत करतात.

मगध, वेनमोनी, मैसूर, सालेम, कलकत्ता, बनारसी, कौरी, घानागेते आणि बागेर्हती या पानाच्या विविध जाती आहेत. जातींचे वर्गीकरण हे रंग, आकार, चव आणि गंधावरून केले जाते. पानाचा रंग पिवळसर हिरवा ते गडद हिरवा, चमकदार पृष्ठभाग आणि गंध वैशिष्ट्यपूर्ण असतो. गोड, तिखट चव पानांमध्ये असणाऱ्या अत्यावश्यक तेलाच्या घटकांमुळे असते.

औषधी गुणधर्म :

पान हे स्ट्रेप्टोकोकस पायरोजेन्स, स्टेफिलोकोकस ऑरियस, प्रोटीस वल्गारिस, एशेरिचिया कोलाई आणि स्यूडोमोनस एरुगिनोसा रोगाणू विरुद्ध विरोधी कृती दर्शवते. पानांच्या अर्कात एन्ट्रोकोकस फॅकलिस, सिट्रोबॅक्टर कोसेरी आणि सायट्रोबॅक्टर फ्रुंडी या सारख्या मूत्रमार्गाच्या रोगकारकांचा नाश करण्याची क्षमता देखील आहे. केस, त्वचा आणि नखांना बुरशीजन्य सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण करते.

मधुमेह विरोधी क्रियेमध्ये पानातील घटक महत्त्वाचे ठरतात.

पोटविकार संरक्षणात्मक क्रियेसाठी पानातील घटक महत्त्वाचे आहेत.

Betel Leaf
Betel Leaf Market : दिवाळीनिमित्त खाऊच्या पानाला चांगली मागणी

मौखिक आरोग्यासाठी पान चांगले असते.

विड्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी विड्याच्या पानाचाही वापर करता येतो.

विड्याच्या पानांचा फेस पॅक अनेक प्रकारे वापरला जातो.

Betel Leaf
Betel Leaf : पानपिंपरी, खाऊच्या पानाला शेतीपीक म्हणून मान्यता द्या

पानापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

पावडर:

पानाची पावडर बनवण्यासाठी ताजी, हिरवी पाने घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. पाने बारीक चिरून ती हॉट एअर ओव्हन मध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानास ३ तास वाळवावीत. ग्राइंडरच्या साह्याने पावडर तयार करावी. बनवलेली पावडर विविध अन्न पदार्थामध्ये वापरास उपयुक्त ठरते.

पापड :

मीठ, मसाला, खाद्यतेल आणि पापड खार यासोबत कडधान्य किंवा डाळीच्या पिठाचा वापर करून पापड तयार करतात.

घटक---प्रमाण (ग्रॅम)

मूग पीठ---५५

उडीद पीठ---४०

मिरी पावडर---१

पापडखार---१

व्हिनेगार---३-४ थेंब

मीठ---२

पान पावडर---५

खाकरा:

खाकरा तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ आणि घटक मसाले एकत्र करून पोळी बनवली जाते. ती मंद आचेवर भाजली जाते.

चॉकलेट:

२० विड्याची पाने, २५० ग्राम डार्क चॉकलेट कंपाउंड, २० ग्रॅम बडीशेप, ३० ग्रॅम गुलकंद, २५ ग्रॅम किसलेले खोबरे, टुटी फ्रुटी २० ग्रॅम, २० ग्रॅम बडिशेपेच्या गोळ्या घ्याव्यात.

विड्याची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे देठ काढून घ्यावीत. त्यानंतर डार्क चॉकलेट कंपाउंड चाकूच्या साह्याने बारीक कापून घ्यावे. गॅस वरती पातेल्यामध्ये थोडे पाणी गरम करून त्यामध्ये वाटी ठेऊन चॉकलेटचे तुकडे त्या वाटीत टाकावेत. यामुळे चॉकलेट वितळते.

चाकूच्या साह्याने विड्याची पाने बारीक कापून घ्यावीत. वितळलेल्या चॉकलेटमध्ये मिसळावीत. या मिश्रणात बडीशेप, गुलकंद, बडीशेपेच्या गोळ्या, किसलेले खोबरे, टुटी फ्रुटी मिसळावी. या मिश्रणाचे हाताच्या साह्याने छोटे छोटे गोळे करून किंवा साच्याच्या मदतीने हवा तो आकार देवून फ्रिज मध्ये घट्ट होण्यासाठी १५ ते २० मिनिटे ठेवावे. बनवलेले चॉकलेट बंद डब्यांमध्ये साठवावे.

संपर्क : व्ही. आर. चव्हाण,९४०४३२२६२३

(एम जी एम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली,छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com