Retreating Monsoon : चिपळूण परिसरात दोन तास मॉन्सूनोत्तर पाऊस

Rain Update : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने रविवारी (ता. २०) सावर्डे, असुर्डे, डेरवण, कोंडमळा परिसराला दोन तास झोडपून काढले.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने रविवारी (ता. २०) सावर्डे, असुर्डे, डेरवण, कोंडमळा परिसराला दोन तास झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे सावर्डे आठवडा बाजारात ग्राहकांसह भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती.

त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाला. भाजीपाला व किरकोळ कापड विक्रेत्यांचे माल भिजल्याने नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाला होता. सावर्डे परिसरात शनिवारपासून पावसाने उसंत घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. रविवारी पहाटे तर सर्वत्र धुक्याचे वलय पसरले होते.

Rain
Rain Update : सलग दोन दिवसांपासून पावसाची जिल्ह्यात ‘बरसात’

त्यामुळे पाऊस माघार घेत आहे, असे सर्वांना वाटत होते. सकाळी स्वच्छ व दुपारी कडक उन्हाच्या झळाही जाणवत होत्या. शेतकरी पावसाचा अंदाज बघून कापणीच्या कामात व्यग्र असताना अचानक दुपारी दोनच्या सुमारास आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापलेले भात पीक भिजल्याने शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले आहेत.

यंदा शेतीपूरक पाऊस झाल्याने भाताचे पीक जोमात आहे. कुठेही पिकावर किडींचा प्रादुर्भाव जाणवल्याची तक्रार नाही. मात्र आता भात कापणीच्या हंगामातच सतत पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पक्व भात शेती जमिनीलगत पडली आहे.

Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने भात पीक कुजण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. कापलेते भात पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. कापलेले भात झोडणे, सुकवणे व पेंढा सुकत घालणे ही कामे करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. भाताचेही नुकसान होत आहे.

कृषी खात्याने नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. डेरवण येथे सुरू असलेल्या विभागीय मैदानी स्पर्धांना पावसाचा फटका बसला. मैदान ओले झाल्यामुळे स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com