Pune News : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तुरळक ठिकाणी सरी कोसळत आहे. रविवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळ तालुक्यातील लोणावळा येथे ३२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत असून काढणी केलेल्या पिकांचे व भाजीपाला नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला व फळभाज्यांच्या दरात वाढ होत आहे.
गेल्या आठवड्यात देशातून परतीचा पाऊस गेल्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस पडत आहे. सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी दहानंतर ऊन पडत असले तरी दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अचानक आभाळ भरून येत असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने रब्बीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यामुळे रब्बीत पुन्हा कर्ज घेऊन नियोजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
हवेली तालुक्यातील केशवनगर येथे १२ मिलिमीटर, तर पुणे वेधशाळा, चिंचवड, हडपसर, वाघोली येथे पावसाचा शिडकावा झाला. मुळशीतील पौड, घोटावडे येथे १३ मिलिमीटर, तर थेरगाव १०, मुठा येथे १४ मिलिमीटर पाऊस झाला.
भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, निगुडघर येथे तुरळक सरी बरसल्या. मावळमधील वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला येथे हलका, वेल्हा येथे १८ मिलिमीटर, तर पानशेत, विंझर, आंबवणे येथे तुरळक, जुन्नरमधील नारायणगाव येथे २४ मिलिमीटर,
तर वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर येथे हलका, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कडुस येथे तुरळक, आंबेगावमधील मलठण येथे २८ मिलिमीटर, तर घोडेगाव, कळंब, मंचर, शिरूर रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर येथे हलका, बारामतीतील वडगाव, सुपा, दौंडमधील राहू, रावणगाव, खामगाव, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, राजेवाडी, वाल्हा येथे चांगलाच शिडकावा झाला. त्यामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.