
Chh. Sambhajinagar News : ताणास सहनशील असणारे डाळिंब फळपिक चांगल्या दरांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक व विविध पोषणमूल्यांमुळे ग्राहकांना पोषण सुरक्षितता पुरविणारे म्हणजे सर्वार्थाने सुरक्षितता पुरविणारे हे फळपीक, असल्याचे प्रतिपादन हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
‘ॲग्रोवन व एच डी एफ सी बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ( ता.१९) लाडसावंगी ( ता. जि. छ. संभाजीनगर) येथे आयोजित ‘डाळिंब- मोसंबी व्यवस्थापन’ या विषयी ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सरपंच रमेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी मेघशाम गुळवे, एचडीएफसी बँकेचे विभागीय व्यवस्थापक अमोल शेरकर, एचडीएफसी बँक शाखा व्यवस्थापक अमोल मगरे आदींची उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले, की फळपिके आपणाकडे उपलब्ध असलेले पाणी, जमिनीचा प्रकार आणि बाजारभाव आदीं बाबी ध्यानात घेऊन डाळिंब- मोसंबी बहराचे नियोजन केल्यास चांगला आर्थिक लाभ तर मिळतो. ही दोन्ही फळपिके अति पाण्यास सहनशील असल्यामुळे विशेषतः डाळिंब ताणास अतिसहनशील असल्याने सिंचन करणेसाठी ठिबकचा वापर करणे जास्त उत्पादनासाठी व पाणी बचतीसाठी अति फायद्याचे ठरते.
तालुका कृषी अधिकारी श्री. गुळवे म्हणाले, की आपण उत्पादनात आघाडीवर पण विक्रीमध्ये मागे असल्यामुळे गटांद्वारे विक्री करण्याची गरज आहे. एच. डी. एफ. सी. बँकेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन एचडीएफसी बँक शाखा व्यवस्थापक श्री मगरे यांनी केले.
कार्यक्रमाला पुरस्कारप्राप्त शेतकरी जगन्नाथ तायडे, कल्याण दाभाडे, पद्मसिंह बमणवत, उद्यान पंडित बाबासाहेब पडूळ आदींची उपस्थिती होती. ॲग्रोवनचे वितरण सहव्यवस्थापक अजित वाणी यांनी प्रास्ताविक तर गणेश पवार यांनी आभार मानले.
‘ॲग्रोवन’तर्फे शेतकऱ्यांचा गौरव
या कार्यक्रमादरम्यान प्रयोगशील व आपल्या पीक, पूरक उद्योगात सातत्य ठेवून असलेल्या भाऊसाहेब पडूळ, माणिक चौधरी, आकाश घोडके, राजेंद्र पवार, पवन पडूळ आदी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.