Pomegranate Export : निर्यातयोग्य डाळिंबातून नफा वाढविण्याची सुवर्णसंधी

Pomegranate Farming : डाळिंब शेती व्यावसायिक पद्धतीने केली तरच फायदेशीर ठरेल. यासाठी माती, पाणी, देठ, पान परीक्षण करून गरजे इतकेच अन्नद्रव्ये द्यावे.
Pomegranate Export
Pomegranate Export Agrowon
Published on
Updated on

Ahilynagar News : जिल्ह्यातून पहिला कंटेनर अमेरिकेला गेला ही आपल्यासाठी सुवर्णसंधी असून निर्यात योग्य डाळिंब उत्पादन करून नफा वाढविणे गरजेचे आहे. निर्यातीचे निकष पाळून काम करायला हवे. रासायनिक आणि जैविक उत्पादनांचा सुवर्णमध्य साधल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन वाढेल, असे प्रतिपादन डाळिंब तज्ज्ञ प्रमोद देशमुख यांनी केले.

आढळेश्वर आश्रम, जवळे कडलग (ता.संगमनेर) येथील शेतकऱ्यांसाठी दैनिक ॲग्रोवनच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ॲग्रोवन’ व ‘हंटिन ॲग्री क्लिनिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब शेतीतील समस्या व कायमस्वरूपी उपाययोजना याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Pomegranate Export
Pomegranate Farming: वाढत्या तापमानात डाळिंबाची दर्जा राखण्यासाठी प्रयत्न

या वेळी ते बोलत होते. हंटिन ऑरगॅनिक्स प्रा.लि.चे प्रमुख कृषी सल्लागार सुशांत सुर्वे, प्रतिनिधी राजेश सक्सेना, नामदेव भिंगे, नितीश कदम, श्री ॲग्रो ऑरगॅनिक (संगमनेर)चे संचालक अनिल देशमुख, सतीश पानसरे, डाॅ. प्रेम भारद्वाज, विष्णुपंत रहाटाळ, संजय देशमुख, भाऊसाहेब देशमुख, सुनील देशमुख, भास्करराव सुर्वे, प्रदीप सुर्वे, संजय सुर्वे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की डाळिंब शेती व्यावसायिक पद्धतीने केली तरच फायदेशीर ठरेल. यासाठी माती, पाणी, देठ, पान परीक्षण करून गरजे इतकेच अन्नद्रव्ये द्यावे. तसेच झाडावर रोग, किडीपेक्षा जैविक-अजैविक ताण असतात. यामुळे जास्त नुकसान होते. यावर शेतकऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. अति उन्हामुळे सध्या एनपीके सोबतच अन्नद्रव्ये उचलण्यासाठी जिवाणूंचा वापर हवा तसेच समुद्री शेवाळे (सिवीड) ह्याची पण जोड देणे गरजेचे आहे.

Pomegranate Export
Pomegranate Pack House : आटपाडी बाजार समितीत डाळिंब पॅक हाऊस सुरू

हंटिन ऑरगॅनिक्स प्रा.लि.चे प्रमुख कृषी सल्लागार सुशांत सुर्वे यांनी हंटिनच्या विविध उत्पादनांची माहिती देऊन रासायनिकला १०० टक्के पर्याय अशी हंटीन ऑरगॅनिकची उत्पादने शेतकऱ्यांनी वापरावीत, असे सांगितले.

हंटिन ॲग्रो क्लिनिकचे व्यवस्थापक नरेश माळवे यांनी सांगितले की, प्रत्येक भारतीयाच्या आहारात सकस आणि सुरक्षित अन्न असावे या करता बळीराजाला शेती आणि मातीत येणाऱ्या मूलभूत समस्यांचे ‘नैसर्गिक’ आणि ‘वैज्ञानिक’ पद्धतीने ‘शाश्‍वत’ समाधान मिळावे या उद्देशाने भारतात प्रथमच हंटिंन ऑरगॅनिक्स प्रा.लि. कंपनीने हंटिन ॲग्रो क्लिनिक हे देशातील पहिले ॲग्री बायोटेक फ्रँचायजी मॉडेल कार्यकारी संचालक नितीन सिंघल यांच्या संकल्पनेतून संगमनेर येथे ‘श्री ॲग्रो ऑरगॅनिक’ या ठिकाणी सुरू केले आहे.

या ‘ॲग्री क्लिनिक’मध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल पिकवताना येणाऱ्या कीड-रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन मातीतून येणारे बुरशीजन्य रोग या खेरीज मृदा संवर्धन आणि जैविक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे सिनिअर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख यांनी केले. विनायक पानसरे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com