Sangli Loksabha 2024 : सांगली लोकसभेत मतदानाचा टक्का घटला

Loksabha Election Update : सांगली लोकसभा मतदार संघात अंतिम मतदान ६०.९५ टक्के झाले. गत निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये ६५ टक्के मतदान झाले होते.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली लोकसभा मतदार संघात निवडणुकीत तिरंगी लढत असली तरी, महायुतीचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली आहे. सांगली लोकसभा मतदार संघात अंतिम मतदान ६०.९५ टक्के झाले. गत निवडणुकीत म्हणजे २०१९ मध्ये ६५ टक्के मतदान झाले होते.

मात्र, या लोकसभेत मतदानात चार टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे मतदानाचा घटलेल्या टक्क्याचा फटका कोणाला बसणार? विजयी कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, एका बाजूला उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली असल्याचे चित्र आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात महायुतीने विद्यमान खासदार संजय पाटील यांना तिकीट देऊन उमेदवारी जाहीर केली. त्याच वेळी महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेबाबत गुऱ्हाळ सुरू होते. त्यातच उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेर ठाकरे) उमेदवारी जाहीर केली.

महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यावरून अनेक दिवस घोळ सुरू होता. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार की काय, अशी चर्चा रंगली होती. काँग्रेसकडून विशाल पाटील यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे सांगलीची चर्चा राज्यभर झाली.

Election
Loksabha Election : सोलापूर, माढा लोकसभेच्या जागांसाठी चुरशीने मतदान

सुरुवातीच्या टप्प्यात खासदार संजय पाटील यांना ही निवडणूक सोपी जाईल, असे बोलले जात होते. मात्र अंतिम टप्प्यात निवडणुकीत जोरदार चुरस झाली. त्यांनी सुद्धा प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा घेतल्या. त्याचा परिणाम काय होणार, याबाबतही उत्सुकता असणार आहे.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आमदार जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या. त्याशिवाय काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे सांगली, विटा येथील सभेत प्रचारासाठी व्यासपीठावर आले. या सर्वांचा मतदानावर किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Election
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीमुळे शासकीय कार्यालये पडली ओस

निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने सुरुवातीस माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र अंतिम टप्प्यात तो काढून घेऊन विशाल पाटील यांना देण्यात आला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मात्र जाहीर प्रचाराचा एकहाती किल्ला लढवला. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या त्यांच्याबरोबर प्रचारात होत्या.

शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर यांनी मिरज येथे जाहीर सभा घेतली. त्यामुळे सांगली लोकसभेत चुरशीने मतदान होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही निवडणूक तिरंगीऐवजी दुरंगीच झाल्याची बोलले जात आहे. मात्र, गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत चार टक्क्यांनी मतदान घटले आहे. मुळात, मतदानाचा टक्का घटला की, विद्यमान खासदारांना याचा फायदा होतो, असे चित्र असते. परंतु या वेळेस चित्र उटले होणार का? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये टक्केवारी वाढली

२०१९ मध्ये सांगली लोकसभा मतदार संघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी चांगली होती. तासगाव-कवठेमहांकाळ या विधानसभा मतदार संघात २०१९ ला ५९.८५ टक्के मतदान झाले होते.

या निवडणुकीत या मतदार संघात ६६.०६ टक्के मतदान झाले आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी, इतर पाच विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी घटली आहे. त्यामुळे या संघात कोणाला किती मते मिळाली, हे निकालावेळीच समोर येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com