
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचना, सरपंच आरक्षण सोडत, मतदार यादी अशी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे. प्रक्रिया पूर्ण आहे, परंतु ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोग आदेश काढत नसल्याने या ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात अडकल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या, महापालिका व नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका २०२२ पासून ठप्प आहेत. जिल्हा व तालुका पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण व प्रभाग रचनेचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
ग्रामपंचायतींसाठी मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असताना निवडणुका ठप्प झाल्या आहेत. निवडणुकांसाठी पात्र असलेल्या ५० ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ११ ग्रामपंचायती माळशिरस तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील भांबुर्डी, डोंबाळवाडी (कु), सुळेवाडी, झंजेवाडी (खु), पिलीव, कदमवाडी, जाधववाडी, हनुमानवाडी, झिंजेवस्ती (पि.), खुडूस, डोंबाळवाडी (खु.) या गावांचा समावेश आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सात ग्रामपंचायती असून, त्यामध्ये खवे, येळगी, कागस्ट, जित्ती, हन्नूर, माळेवाडी, शिवणगीचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी, बिटरगाव, जळोली, जाधववाडी, गार्डी, पांढरेवाडीचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील लाडोळे, सुर्डी, दहिटणे, रुई, ताडसौंदणे,
सांगोला तालुक्यातील सोनंद, गळवेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी, राजापूर, अक्कलकोट तालुक्यातील संगोगी (ब), सातन दुधनी, कल्लप्पावाडी, समर्थनगर, गांधीनगर या प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मोहोळ तालुक्यातील वडदेगाव, गोटेवाडी, कोन्हेरी, लमाणतांडा, करमाळा तालुक्यातील लव्हे, वरकुटे, भाळवणी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव, कुडल व माढा तालुक्यातील उजनी टें., वेणेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.