Farmer Welfare Policy : शेतकरी हिताच्या धोरणांवर भर देण्याची गरज

Agriculture Policy : शेतीमालाची उत्पादकता वाढली असली तरी बाजार अस्थिर आहे. त्यामुळे उत्पादकता वाढीनंतर देखील उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याने देशातील शेतकऱ्यांची स्थिती बदलली नाही.
Agriculture Policy
Agriculture PolicyAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : शेतीमालाची उत्पादकता वाढली असली तरी बाजार अस्थिर आहे. त्यामुळे उत्पादकता वाढीनंतर देखील उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याने देशातील शेतकऱ्यांची स्थिती बदलली नाही. त्याकरिता केंद्र सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्नात दुप्पट वाढीच्या उद्देशाने पूरक उपायांवर भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्‍त केले.

कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर (बडनेरा) येथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था (नागपूर), अटारी (पुणे) यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या विशेष प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. अर्जुन तायडे होते. पाहुणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, केव्हीकेचे प्रमुख डॉ. के. पी. सिंह यांची उपस्थिती होती.

Agriculture Policy
Agricultural Policy Reforms 2025: शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या नव्या कृषी धोरणातील सुधारणा

खासदार वानखडे पुढे म्हणाले, की देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. त्यामागे निश्‍चितच देशातील शेतकऱ्यांचे योगदान आहे. परंतु नजीकच्या काळात केंद्र सरकारस्तरावर शेतीमालाची आयात- निर्यात धोरण ही शेती आणि शेतकरीपूरक नाहीत. त्याचा फटका शेतमाल उत्पादकांना बसत आहे.

उत्पादकता खर्चात वाढ झाली असताना सरकारकडून ग्राहकांना कमी दरात धान्य मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. यामध्ये मात्र शेतकरी नाहक भरडला जात आहे. शेतकरी हिताची धोरण राबविण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अर्जुन तायडे यांनी केंद्र सरकारच्या वतीने प्रस्तावीत विशेष कापूस लागवड प्रकल्पाविषयी माहिती दिली.

Agriculture Policy
Maharashtra Agriculture Policy: कृषी धोरणात कोरडवाहू शेती दुर्लक्षित

ते म्हणाले, देशातील आठ राज्ये तसेच १२ हजार गावांत या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रातील १६ कापूस उत्पादक जिल्हयात याची अंमलबजावणी होईल. अमरावती जिल्ह्यात २ लाख ७४ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. यातील ९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रफुल्ल महल्ले, डॉ. हर्षद ठाकूर, महेश आखूड, राहुल घोगरे, सुरेश वैद्य, आरती वर्मा, कैलास शेखावत, विनायक जिराफे, सचिन पिंजरकर, प्रणाली देशमुख, डॉ. विशाखा पोहरे यांची उपस्थिती होती.

यातील ९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रफुल्ल महल्ले, डॉ. हर्षद ठाकूर, महेश आखूड, राहुल घोगरे, सुरेश वैद्य, आरती वर्मा, कैलास शेखावत, विनायक जिराफे, सचिन पिंजरकर, प्रणाली देशमुख, डॉ. विशाखा पोहरे यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com