POCRA Scam : ‘पोकरा’तील गैरप्रकाराची १८ पथकांकडून चौकशी

POCAR Corruption Jalna : जालना जिल्ह्यातील जालना व परतूर उपविभागात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (पोकरा) शेडनेट उभारणीत झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आठवडाभरापासून १८ पथकांकडून चौकशी सुरू आहे.
POCRA 2.0
POCRAAgrowon
Published on
Updated on

Jalna News : जालना जिल्ह्यातील जालना व परतूर उपविभागात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (पोकरा) शेडनेट उभारणीत झालेल्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आठवडाभरापासून १८ पथकांकडून चौकशी सुरू आहे. पथकात सुमारे ३८ अधिकारी असून ३२८९ शेडनेट प्रकरणांची तपासणी हे पथक करीत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०२०-२१ ते २०२३-२४ पर्यंतच्या या काळातील शेडनेटगृह उभारणीची ही चौकशी आहे. या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने ‘पोकरा’च्या मुंबई कार्यालयातील दक्षता पथकाने डिसेंबर २०२३ मध्ये तपासणी अहवाल सादर केला होता. त्यानंतर या योजनेच्या प्रकल्प संचालकांनी जुलै २०२४ मध्ये लेखा परीक्षण अहवाल सादर केला. या योजनेतील वसूलपात्र रक्कम पाहता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी सप्टेंबर २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कृषी सहसंचालकांना दिले होते.

POCRA 2.0
POCRA Subsidy Scam : यंत्र-अवजारांचे अनुदान लाटणाऱ्यांकडून वसुलीचे निर्देश

त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये मंत्रालयातून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत गुन्हे नोंदविण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात आली होती. परंतु त्यानंतर माशी कुठे शिंकली कोण जाणे ॉविभागीय चौकशी रेंगाळली होती. आता २१ जूनपासून विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशानुसार नांदेड, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतील कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या १८ पथकांमध्ये ३८ जणांचा समावेश आहे.

हे पथके जालना जिल्ह्यातील जालना व परतूर उपविभागात चौकशीसाठी दाखल असून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला किमान जालना उपविभागातील सर्व चौकशी २८ जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु चौकशीदरम्यान पावसासह इतर तांत्रिक अडचणींमुळे आलेला व्यत्यय पाहता आणखी काही दिवस चौकशी पूर्ण होण्याला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशीसाठी आलेल्या पथकाचा जालना जिल्ह्यातील मुक्काम वाढणार हे स्पष्ट आहे.

POCRA 2.0
POCRA Scam : ‘पोकरा’ घोटाळ्यातील अधिकाऱ्याला कारवाईऐवजी बढतीचे बक्षीस

मेजरमेंट बुकमधील ५ ‘क’ फॉरमॅटमध्ये ही तपासणी अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक यांना आयुक्त स्तरावरून ‘पोकरा’तील शेडनेटमधील गैरप्रकाराच्या चौकशी संदर्भात विचारणा करण्यात आली होती हे विशेष, असेही सूत्रांनी सांगितले.

या संबंधी ३२६९ प्रकरणांत चौकशी केली जात आहे. यामध्ये जालना उपविभागातील २७२१ तर परतूर उपविभागातील ५४८ प्रकरणांचा समावेश आहे. जालना उपविभागातील सुमारे ७८ टक्के चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरात लवकर ही चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आयुक्तालयाकडे पाठविण्याचा प्रयत्न आहे.
- पी. आर. देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर
खरंतर या आधीच चौकशी व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया व्हायला हवी होती. शेडनेटच नव्हे तर अवजारे बँक, ठिबक सिंचन इतरही अनेक प्रकरणांत गैरप्रकार आहे. या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. गैरप्रकार करणाऱ्यांना वाचविणारे बाकी आहेत. ते सर्व पुढे येईल.
- सुरेश गवळी, तक्रारदार, जाफराबाद जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com