Krishi Sanjivani Yojana : परभणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० अंतर्गत (हवामानाकूल कृषी प्रकल्प : पोकरा) विविध योजनांसाठी वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी १८ हजार १९२ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७०० शेतकऱ्यांना २ कोटी ८५ लाख ६९ हजार ९७१ रुपये अनुदान वितरित करण्यात आले..राज्य शासन व जागतिक बँक यांच्या भागीदारीतील कृषी विभागामार्फत पोकरा २.० प्रकल्प अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १७३ गावांची निवड झालेली आहे. सोमवार (ता.१०)पर्यंत वैयक्तिक लाभाच्या विविध घटकांसाठी १८ हजार १९२ अर्ज केले आहेत. .POCRA Scheme: नांदेड जिल्ह्यात ‘पोकरा’साठी २१ हजारांहून अधिक अर्ज.त्यात फळबाग लागवडीसाठी १ हजार ८८५ अर्ज, ठिबक सिंचन ६ हजार ११८, तुषार सिंचन संच ४ हजार ४९५ अर्ज, वैयक्तिक शेततळे (इनलेट, आउटलेट) १८६, शेततळे २०३, अस्तरीकरण १५०, सामूहिक शेततळे १२, शेततळ्यातील मत्स्यपालन ६८, बीजोत्पादन ५०७, शेडनेटगृह /हरितगृहामधील फूल लागवड साहित्य १८, शेडनेटगृह /हरितगृहामधील भाजीपाला लागवड साहित्य १०१, नाडेप १५०, गांडूळ खत निर्मिती युनिट ५०८, विहीर पुनर्भरण ९९९, वृक्ष लागवड ४५२, बांबू लागवड २३४, कृषी पंप ५७, पाइप्ससाठी १४८ अर्ज आले आहेत..Pikvima Yojana: परभणी, हिंगोलीत विम्याचे ६४ हजार अर्ज.शेळीपालन १२, तुती लागवड ७२८, रेशीम कीटकसंगोपन गृह बांधकाम ६१०, रेशीम कीटक संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण ३४४ अर्ज आले आहेत. त्यापैकी पूर्वसंमती डेस्क २ वर १ हजार ५९९, तर डेस्क ३ वर ६१७ अर्ज आहेत. मंजुरी डेस्क ४ वर १ हजार ७५ अर्ज, डेस्क ५ वर १ हजार १०१ अर्ज तर डेस्क ६ वर १६ अर्ज, डेस्क ७ वर ३३ अर्ज आहेत..पडताळणी, मोजमाप पूर्ण झालेल्यानंतर अनुदान वितरित करण्यासाठी पेमेंट रिक्वेस्ट डेस्कवर ८ हजार ७१२ अर्ज आहेत, ७०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे (डीबीटी) २ कोटी ८५ लाख रुपयांवर अनुदान जमा करण्यात आले. याअंतर्गत वेब पोर्टल तसेच महाविस्तार एआय ॲपद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. https://dbt-ndksp.mahapocra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील. फार्मर आयडीचा (शेतकरी ओळख क्रमांक) वापर करून थेट लॉगीनची सुविधा आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.