Punganur Cow : गोसवेतून पंतप्रधान मोदींचा पुंगनूर गाय संवर्धनाचा संदेश

Narendra Modi Goseva : हिंदू धर्मामध्ये गायींना अनन्य साधारण महत्त्व आहे. मकर संक्रातीनिमित्त मोदी पुंगनूर जातीच्या गायींना चारा खायला घालताना दिसत आहेत.
Narendar Modi Punganur Cow
Narendar Modi Punganur CowAgrowon

Punganur Cow Conservation : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या बेधक निर्णयांमुळे कायम चर्चेत असतात. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात मोदींना अनेक महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. कश्मिरमधील ३७० कलम हटवणे असो वा एका रात्रीत नोटबंदी करणे, यासारखे निर्णय मोदींनी घेतले आहेत.

गोवंश हत्याबंदी कायदा हाही त्यापैकीच एक निर्णय. आपल्या कृतीतून मोदी देशवासियांना काही ना काही संदेश देत असतात. मकर संक्रांतीनिमित्त नामशेष होण्याच्या मार्गावर असेलेल्या पुंगनूर गायीच्या संवर्धनाचा संदेश मोदी यांनी दिला आहे. मोदी पुंगनूर गायींची गोसेवा करत असलेला व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

देशाचा कारभार करताना मोदी भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला महत्त्व देताना दिसतात. आपल्या अनेक भाषणांमध्ये मोदी हिंदू संस्कृतीचे दाखलेही देतात. हिंदू धर्मामध्ये गायींना अनन्य साधारण महत्त्व आहे.

मकर संक्रातीनिमित्त मोदी पुंगनूर जातीच्या गायींना चारा खायला घालताना दिसत आहेत. गायींना चारा खायला घालतानाचा मोदींचा हा व्हिडीओ त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान आवासातील आहे.

Narendar Modi Punganur Cow
Punganur Cow : जगातली सर्वात बुटकी 'पुंगनूर गाय' नामशेष होण्याच्या मार्गावर ; उंची अवघी ३ फूट

पुंगनूर संवर्धनाचा संदेश

भारतात प्राचीन काळापासून घरोघरी गायी पाळण्याची प्रथा आहे. भारतात देशी गायींच्या अनेक जाती पाहायला मिळतात. भारताचं वैभव असणाऱ्या या देशी गायी जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पुंगनूर जातीची भारतीय देशी गाय देखील सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान मोदी गोसेवेच्या माध्यमातून एकप्रकारे भारताची शान असणाऱ्या पुंगनूर गायीच्या संवर्धनाचा संदेशच दिला आहे.

Narendar Modi Punganur Cow
Indigenous Cow Project : भारतातील पहिला देशी गोवंश सुधारणा प्रकल्प बारामतीत

पुंगनूर गायीची वैशिष्ठ्ये

जगातील सर्वात छोट्या गाय म्हणून पुंगनूर गाय ओळखली जाते. पुंगनूर गायीची प्रजाती प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यामध्ये आढळते. येथील पुंगनूर गावाच्या नावानेच या गायीच्या प्रजातीला ओळख प्राप्त झाली आहे. अवघी अडीच ते तीन फूट इतकी उंची असणारी ही गाय सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

आंध्र प्रदेशमध्ये तिच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या गायीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीची उंची. पुंगनूर ही जगातील सर्वात कमी उंची असलेली गाय आहे. त्यामुळे या गायीला जगातील सर्वात कमी उंचीच्या गायीचा दर्जा प्राप्त झाला आहे.

देशी गायींची जागा घेतली संकरित गायींनी

पूर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यात देशी गायींच प्रमाण जास्त असलेले पाहायला मिळायचे. पण अलिकडे शेतकऱ्यांच्या गोठ्यात देशी गायींची जागा जास्त दूध देणाऱ्या संकरित गायींनी घेतली आहे. दूध उत्पादनासाठी पशुपालकांचा ओढा संकरित गायी पाळण्याकडे वाढू लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com