Team Agrowon
बारामती येथे देशी गोवंश सुधारणा प्रकल्पामुळे दुधाच्या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक असा हा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
भारतातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
या प्रकल्पामुळे पुढील दोन वर्षांत दुधाची अर्थव्यवस्था बदलणार आहे.
ब्राझीमधील गीर गाय दिवसाला ६० लिटर दूध देते, आपल्याकडे तसेच व्हावे असा प्रयत्न आहे.
प्रजनन, सुधारित पोषण, प्रशिक्षण व जागरूकता निर्माण करण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.
पशुधन अनुवंश सुधारणा अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. एम्ब्रियो ट्रान्स्फर (IVF) लॅबोरेटरी याठिकाणी सुरू करण्यात आली आहे.