PM Modi : बनास डेअरीला पंतप्रधान मोदींकडून १०६ कोटी रुपयांचं बोनस

Milk Production : मागील १० वर्षात ६५ टक्क्यांनी दूध उत्पादन वाढलं आहे. बनास डेअरी १ लाख शेतकऱ्यांकडून दूध संकलित करत आहे. तसेच गीर गायींचे वाटप करून पशुपालकांना सक्षम करत आहे, असंही मोदी यांनी प्रतिपादन केलं.
PM Modi
PM Modi Agrowon
Published on
Updated on

Dairy Industry : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनास डेअरीसाठी १०६ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. तसेच पशुपालकांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी काशीमध्ये ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे शुक्रवारी (ता.११) उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "बनास डेअरीने काशीतील हजारो कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. विशेषत: महिलांना सक्षम बनवलं आहे. पूर्वांचलमधील अनेक बहिणी आता लखपती दीदी झाल्या आहेत. पूर्वी जगण्याची चिंता होती, आता मात्र त्यांची पावलं समृद्धीकडे वळाली आहेत." असा दावाही मोदींनी केला.

पुढे मोदींनी देशातील दूध उत्पादनात मोठी वाढ झाल्याचा दावा केला. मोदी म्हणाले, "आज भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. मागील १० वर्षात ६५ टक्क्यांनी दूध उत्पादन वाढलं आहे. बनास डेअरी १ लाख शेतकऱ्यांकडून दूध संकलित करत आहे. तसेच गीर गायींचे वाटप करून पशुपालकांना सक्षम करत आहे." असंही मोदी यांनी प्रतिपादन केलं.

यावेळी मोदींनी जीआय टॅग उत्पादनावर भाष्य केलं. वाराणसी भागातील ३० हून अधिक उत्पादनांना जीआय टॅग दिले आहेत. त्यामध्ये तबला, शहनाई, थंडाई, लाल मिरची, लाल पेडा आणि तिरंगा बर्फी यांचा समावेश आहेत. जीआय टॅग केवळ एक प्रमाणपत्र नाही. तर आपल्या मातीची ओळख पटवणारा पासपोर्ट असल्याचं मोदी म्हणाले.

PM Modi
PM Modi Healthcare: देशात आरोग्यसेवांपासून कुणीही वंचित राहणार नाही

उत्तर प्रदेशातील उत्पादन जागतिक ब्रॅंड होत असून जीआयमुळे ऊंची गाठली आहे, असा दावा मोदींनी केला आहे. यावेळी काशीच्या विकासाशी संबंधित एक महत्त्वाचा प्रकल्प बनास डेअरी आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांना जोडण्याचं काम करण्यात आलं आहे, असं प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com