PM Kisan Yojana Payment Updates: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वितरित होण्याआधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही. यामुळे या शेतकऱ्यांना किसान सन्मानचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील हप्ता मिळवण्यासाठी त्यांना ही प्रक्रिया करावी लागणार आहे..महाराष्ट्रातील १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांचा समावेशकृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशातील एकूण ३०,१८,३६१ शेतकऱ्यांचे आधार–बँक खाते जोडणी (सीडिंग) प्रलंबित आहे. या यादीत उत्तर प्रदेशातील १० लाख ४४ हजार २००, गुजरात २ लाख ९० हजार ३५८, राजस्थान २ लाख १३ हजार ७७९, कर्नाटक १ लाख ३० हजार २६३, पश्चिम बंगाल १ लाख २२ हजार १०६, मध्य प्रदेश १ लाख ८७ हजार ११ आणि महाराष्ट्रातील १ लाख ७२ हजार ३४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. बिहारमधील १ लाख ३९ हजार ४३० शेतकऱ्यांची आधार बँक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. ही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरातून दिली आहे..PM Kisan Yojana: तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं आहे का? 'असे' तपासा.पीएम किसान योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. पीएम-किसान योजनेअंतर्गत, उच्च आर्थिक उत्पन्नाशी संबंधित काही अपवाद वगळता पिकाखालील जमीन हा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठीचा प्राथमिक पात्रता निकष आहे. ही योजना सुरू झाल्यापासून सरकारने २१ हप्त्यांमधून सुमारे ४.०९ लाख कोटी रक्कम वितरित केली आहे..Kisan Credit Card: ‘किसान क्रेडिट कार्ड’ची वैधता ६ वर्षांपर्यंत वाढणार .या योजनेचे हप्ते डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही, तेथे पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाऊ शकत नसल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शेतकरी एक बँक बदलून दुसऱ्या बँकेत खाते उघडू शकतात, त्यामुळे आधारशी बँक खाते जोडणी ही सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया असल्याचे सांगण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.