PM Kisan Scheme : कुटुंबातील एकालाच ‘पीएम किसान’चा लाभ

PM Kisan Yojana Rule : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावलीत बदल केला असून, नवी नियमावली लागू केली आहे.
PM Kisan KYC
PM KisanAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ः पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावलीत बदल केला असून, नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार आता या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पेन्शनर, आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी वर्गवारीनिहाय पडताळणी करण्याची प्रक्रिया तालुकास्तरावर मोहिम स्वरूपात चालू आहे.

PM Kisan KYC
PM Kisan: पीएम किसानची रक्कम १० हजारांपर्यंत वाढविण्याची मागणी

जिल्ह्यामध्ये एकूण १ लाख ५९ हजार ६७० लाभार्थांना विविध कारणाने पीएम किसान पोर्टलवर अपात्र करण्यात आले आहेत. सदर लाभार्थ्यांच्या अपात्रतेच्या कारणांची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावर यादी जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

PM Kisan KYC
PM Kisan Scheme 19th Installment : पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याची तारीख ठरली; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी दिली माहिती

सदर यादीमधील पात्र लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्षेत्रिय कर्मचारी यांच्यामार्फत सात-बारा, फेरफार सहा ड उतारा, आधार कार्ड, कुटुंबातील इतर व्यक्तींचे आधार कार्ड (पती-पत्नी १८ वर्षांखालील अपत्य) इ. कागदपत्रे तालुकास्तरीय क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात यावीत, जे शेतकरी पात्र असूनही त्यांचे नाव अपात्र यादीत समाविष्ट आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अपात्रतेचे हे आहेत निकष

एकाच कुटुंबातील लाभार्थी (पती-पत्नी १८ वर्षांखालील अपत्य वगळून), राज्याचा रहिवासी नसलेले लाभार्थी, संविधानिक पदावरील व्यक्ती, माजी संविधानिक पदावरील व्यक्ती, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था निमशासकीय कर्मचारी, जमिन विक्रीमुळे भूमीहिन लाभार्थी, संस्था मालकी असलेल्या जमीनधारक, नोंदणीकृत व्यवसायिक, सलग ३ वर्ष आयकर भरणारे लाभार्थी, स्वत: लाभ समर्पित केलेले लाभार्थी, वयोवृद्ध, सेवा निवृत्तीधारक लाभार्थी, जमिनीची मालकी स्वत: नावे नसलेले लाभार्थी, दुबार नोंदणी असलेले, शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक, अनिवासी भारतीय, खोट्या माहितीद्वारे नोंदणी केलेले लाभार्थी, अपात्र ठरतील, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com