
Shaktipeeth Agriculture News : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शहीद दिनानिमीत्त शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. बाधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भगवा झेंडा रोवण्यात आला. यानंतर शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेधही केला. कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी, कणेरी येथे विरोध करण्यात आला तर सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला.
सरकारला हा महामार्ग रेटायचाच असेल, तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा भगवा झेंडा उतरवावा लागेल. शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध करण्यासाठी अनेक आंदोलने केली आहेत; पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, असे आंदोलकांनी भूमिका मांडली.
यावेळी हातकणंगले तालुक्यातील साजणी गावचे सरपंच शिवाजी पाटील म्हणाले, "विधानसभा निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधींनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे अभिवचन दिले होते. पण निवडून आल्यानंतर पुन्हा शक्तिपीठ महामार्ग होणार, असे सांगत जनतेची फसवणूक करत आहेत. असे शिवाजी पाटील म्हणाले. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, जंबुकुमार चौगुले, विजय पाटील, के. डी. पाटील, अमर कांबळे, दिनकर कांबळे, बाळासाहेब कांबळे, कृष्णात कांबळे यांनी सरकारविरोधात भूमिका मांडली.
भगवा ध्वज शिवरांयाचा...
कोल्हापूरकरांनी बाधित शेतामध्ये भगवे ध्वज फडकविले. 'भगवा ध्वज हा छत्रपती शिवरायांचा ध्वज आहे. तोच भगवा आमचा प्राण आहे. तो आमच्या शेतातून काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये, अन्यथा गाठ शेतकऱ्यांशी आहे असा इशारा देण्यात आला. शेतकरी कुटुंबांच्या मुळावर उठलेल्या या शासनाने हा महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
सांगलीतील शेतकऱ्यांचा जोरदार विरोध
कोल्हापूरबरोबर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 'शक्तिपीठ' महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी जोर वाढू लागला आहे. बाधित शेतकऱ्यांनी कवलापूर (ता. मिरज) येथे शासनाच्या धोरणाचा निषेध केला. शासन धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी दिली. बाधित शेतकऱ्यांनी शेतामध्ये भगवे ध्वज फडकवत, हे ध्वज काढण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही दिला.
शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे, कार्याध्यक्ष शरद पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष घनश्याम नलावडे, जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गुरव, हौसाबाई सावंत यांनी यावेळी शासन धोरणाला कडाडून विरोध करणारी भाषणे केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.