Orchard Cultivation : मनरेगा अंतर्गंत १६६ हेक्टर फळबाग लागवड

MGNREGA : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत यंदा (२०२४-२५) परभणी जिल्ह्यात १ हजार ४४० हेक्टर फळबाग तसेच फुलझाडांची लागवडीचे उद्दिष्ट आहे.
orchard cultivation
orchard cultivationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत यंदा (२०२४-२५) परभणी जिल्ह्यात १ हजार ४४० हेक्टर फळबाग तसेच फुलझाडांची लागवडीचे उद्दिष्ट आहे.ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील २०२ लाभार्थी शेतकऱ्यांनी १६६.६५ हेक्टर फळबाग लागवड केली आहे. या अंतर्गंत आजवर १ लाख ७५ हजार रुपये निधी खर्च झाला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत यंदा जिल्ह्यातील ८१८ शेतकऱ्यांना ७५९.८ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १७७.८५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत.

orchard cultivation
Mango Orchard Management : नवीन अतिघन आंबा बागेत घ्यावयाची काळजी

ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २०२ शेतकऱ्यांनी १६६.६५ हेक्टरवर विविध फळझाडे तसेच फुलझाडांची लागवड केली आहे. त्यात परभणी तालुक्यातील २९ हेक्टरमध्ये आंबा ६ हेक्टर, लिंबू १,संत्रा १ हेक्टर,केळी १८ हेक्टर, जिंतूर तालुक्यातील ३४.७६ हेक्टरमध्ये आंबा १२.७० हेक्टर, चिकू १ हेक्टर, पेरु ६.४० हेक्टर, संत्रा १ हेक्टर, सीताफळ ४.९६ हेक्टर, केळी८.७० हेक्टर, सेलू तालुक्यातील ८.७९ हेक्टरमध्ये आंबा ०.७९ हेक्टर, लिंबू १ हेक्टर, नारळ ०.७५ हेक्टर, सीताफळ १, केळी ५.२५ हेक्टर लागवड आहे.

मानवत तालुक्यात १५.७ हेक्टरमध्ये पेरू २.६ हेक्टर, संत्रा १०.७ हेक्टर, केळी १.८ हेक्टर, पाथरी तालुक्यातील १५.६ हेक्टरमध्ये आंबा ५.८ हेक्टर, केळी २ हेक्टर, निशिगंधा ७.८ हेक्टर, सोनपेठ तालुक्यातील ७.६ हेक्टरमध्ये केळी ७.६ हेक्टर लागवड आहे.

orchard cultivation
Chiku Orchard Issue : वादळी पावसाचा चिकू बागायतदारांना फटका

गंगाखेड तालुक्यातील ४.३५ हेक्टरमध्ये आंबा २.४ हेक्टर, केळी १.९५ हेक्टर, पालम तालुक्यातील ४४.४ हेक्टरमध्ये आंबा ३४ हेक्टर, चिकू ०.४० हेक्टर, केळी ९ हेक्टर, पूर्णा तालुक्यातील ६.४५ हेक्टरमध्ये आंबा ४.१ हेक्टर, चिकू ०.५ हेक्टर, संत्रा ०.९ हेक्टर, गुलाब ०.४ हेक्टर, निशीगंधा ०.५५ हेक्टर लागवड झाली आहे. याअंतर्गंत पाथरी, पालम व पूर्णा तालुक्यात मिळून १ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मनरेगा तालुकानिहाय फळबाग लागवड स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका उद्दिष्ट क्षेत्र लागवड क्षेत्र लाभार्थी संख्या

परभणी २४० २९.०० ३७

जिंतूर २४० ३४.७६ ४७

सेलू १४० ८.७९ ११

मानवत १३५ १५.८ २१

पाथरी १४० १५.६ ८

सोनपेठ १३० ७.६ १२

गंगाखेड १४० ४.३५ ७

पालम १३५ ४४.४ ५१

पूर्णा १४० ६.४५ ८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com