Potato Cultivation : या पद्धतीने करा बटाट्याची लागवड

Potato Crop : बटाटा हे पीक कमी कालावधीत तयार होणारे असून, इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे पूर्वमशागतीपासून लागवडीपर्यंत योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
Potato Cultivation
Potato CultivationAgrowon
Published on
Updated on

Potato Management : बटाटा हे पीक कमी कालावधीत तयार होणारे असून, इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे पूर्वमशागतीपासून लागवडीपर्यंत योग्य काळजी घेणे गरजेचे असते. बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. लागवडी वेळी उष्ण आणि बटाटे पोसण्याच्या वेळी थंड हवामान पिकास पोषक असते.

वाढीच्या काळात सरासरी १५ ते २० अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते. अंकुर फुटणेच्या काळात ३४ सेल्सिअस तापमान पोषक असून, बटाटे कंद पोसण्याच्या काळात २१ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. तापमान २९ अंश सेल्सिअसच्या वर गेले तर कंद तयार होत नाहीत.

पेरणीची वेळ ः

- बटाटा लागवडीसाठी वेगवेगळ्या आकाराचे व वजनाचे कंद वापरले जातात.

- साधारणपणे मध्यम आकाराचे २५ ते ५५ मिमी किंवा २५ ते ७५ ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत.

- रब्बी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात बटाटा लागवड करावी.

Potato Cultivation
Sweet Potato Cultivation : कशी कराल रताळ्याची लागवड?

बेणे निवड ः

- लागवडीसाठी सुप्तावस्था पूर्ण झालेले कंद निवडावेत. नुकतेच काढणी केलेले कंद लागवडीसाठी वापरू नयेत.

- बटाट्यामध्ये सुप्तावस्था असल्यामुळे काही काळ साठवणूक केल्यानंतर कार्यक्षम डोळ्यांची संख्या असलेल्या बेण्याची निवड लागवडीसाठी करावी.

- बेण्याचे वजन ३० ते ३५ ग्रॅम वजनापेक्षा जास्त असल्यास, त्याची २ किंवा ४ भागांमध्ये समान कापणी करावी. कापणी करताना कार्यक्षम डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

लागवड

लागवडीसाठी कुफरी ज्योती, कुफरी सूर्या, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी या सुधारित जातींची निवड करावी. जमिनीची २० ते २५ सेंमी खोल नांगरून भुसभुशीत करावी. रोटाव्हेटरच्या साह्याने ढेकळे फोडून जमीन समपातळीत आणावी.

- लागवडीसाठी सरी वरंबा पद्धती योग्य ठरते. लागवडीसाठी ६० सेंमी अंतराच्या सऱ्या पाडून घ्याव्यात. शिफारशीनुसार खतांच्या मात्रा सऱ्यांमध्ये द्याव्यात. त्यानंतर २० सेंमी अंतरावर बटाटे बेणे ठेवून मातीने झाकून घ्यावे. लागवडीनंतर हलके पाणी द्यावे.

- एक हेक्टर लागवडीसाठी १५ ते २० क्विंटल बेणे पुरेसे होते.

खत व्यवस्थापन ः

- लागवडीपूर्वी रानबांधणी करताना हेक्टरी १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

- बटाटा पिकास हेक्टरी नत्र १५० किलो, स्फुरद ६० किलो व पालाश १२० किलो या प्रमाणे रासायनिक खतांची शिफारस आहे. लागवडीवेळी नत्र खताची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उर्वरित नत्र खताची मात्रा लागवडीनंतर १ महिन्याने द्यावी.

- लागवडीवेळी झिंक सल्फेट २० किलो प्रति हेक्टर प्रमाणे शेणखतात मिसळून द्यावे.

पाणी व्यवस्थापन ः

लागवडीनंतर लगेच पहिले हलके पाणी द्यावे. जमिनीलगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर आणि बटाटा पोसण्याच्या वेळी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.

आंतरमशागत ः

बटाट्यामध्ये खुरपणी बरोबरच मातीची भर देणे गरजेचे असते. तीन ते चार वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. खतांचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी. यामुळे बटाटे चांगले पोसतात व उत्पादनात वाढ होते.

स्त्रोत - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com