Livestock Feed Management : दुधाळ गायी, म्हशींना असा आहार द्या

Team Agrowon

गाई, म्हशींना आहार रुचकर असावा. आहारात विविध प्रकारच्या खाद्य घटकांचा अवलंब करावा. आहार शुष्क तत्त्वांच्या आधार तसेच जनावरांच्या वजनानुसार द्यावा.

Livestock Feed Management | Agrowon

प्रति १०० किलो वजनास २.५ ते ३ किलो शुष्क भाग खाण्यास द्यावा. यापैकी २/३ भाग वैरणीच्या मार्फत म्हणजेच ओली वैरण, कोरडी वैरण इत्यादी आणि १/३ भाग अंबोणाच्या मार्फत द्यावा.

Livestock Feed Management | Agrowon

आहारातील प्रमाणात आणि घटकांत अचानक बदल करू नयेत. जनावरास चवीचे ज्ञान असते. आहारात अचानक बदल केल्यास जनावरे खाद्य खात नाहीत, परिणामी त्यांचे दूध उत्पादन घटते.

Livestock Feed Management | Agrowon

हिरवा चारा फुलोऱ्यात असताना जनावरांना खायला द्यावा म्हणजे चाऱ्यातून जास्तीत जास्त अन्नघटक मिळू शकतात. हिरवा चारा पालेदार आणि रोगविरहित असावा.

Livestock Feed Management | Agrowon

सुका चारा कुट्टी यंत्राद्वारे बारीक करून द्यावा. त्यामुळे चाऱ्याचे नुकसान होत नाही. सुका चारा जसाच्या तसा दिल्यास मुळाकडचा भाग जनावर खात नाही, परिणामी चारा वाया जातो.

Livestock Feed Management | Agrowon

आहारात नियमितपणे असावा. देण्याच्या वेळा बदलू नयेत. त्यांच्या आवश्यकतेनुसार आहार द्यावा. जनावरांना भरपूर पाणी पाजावे. गायींना साधारणपणे ५० ते ६० लिटर पाणी प्रति दिवशी पुरवावे.

Livestock Feed Management | Agrowon

दुधाळ जनावरांच्या प्रसूतीनंतरच्या काळात दुग्धोत्पादन अधिक प्रमाणात होते. परंतु जनावर या काळात कमी खाद्य खातात. त्यामुळे या काळात १०० ग्रॅम प्रति जनावर प्रति दिवस या प्रमाणात बायपास फॅट चा वापर करावा, असे केल्याने दूध उत्पादन वाढते.

Livestock Feed Management | Agrowon

Livestock Tagging : जनावरांना टॅगिंग करण्याचे फायदे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा....