Fertilizer Shortage : खतांची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करा

Kharif Season Seed : खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वेळेवर मिळतील अशा दृष्टीने नियोजन करा अशा सूचना शालेय शिक्षण तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon

Kolhapur News : खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वेळेवर मिळतील अशा दृष्टीने नियोजन करा अशा सूचना शालेय शिक्षण तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ताराराणी सभागृहात श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतखाली कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली, या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजेद्र पाटील - यड्रावकर, ऋतराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Fertilizer Shortage
Crop Competition : खरीप हंगाम स्पर्धेत महाड तालुक्याची बाजी

श्री. केसरकर म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यात उसाखालील क्षेत्र अधिक असून, ऊस उत्पादकता वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. मॉन्सूनची (संभाव्य) स्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने आतापासूनच नियोजन करावे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान पातळीवर खताचे वाटप करण्यात यावे तसेच विविध कंपन्यांच्या बियाणांची गुणवत्ता (उगवण क्षमता) तपासून घेण्यात यावी असे निर्देश ही त्यांनी या बैठकीत दिले.

विशेषता युरिया व डीएपी रासायनिक खतांचा पुरवठा दुर्गम भागातील तालुक्यांना पुरेशा व सम प्रमाणात करण्यात यावा अशी अपेक्षा आमदार राजेश पाटील यांनी केली.

शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीच्या प्रश्‍नांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाकडे मंत्रालयस्तरावर पालकमंत्र्यांनी एका बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com