ठळक मुद्देहवामानाचा अंदाज घेऊन शेतकामाचे योग्य नियोजन केल्याने शेतकरी दरवर्षी १२ हजार वाचवू शकतीलनॅशनल सेंटर फॉर अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या सर्वेक्षणातील माहितीहवामान अंदाजांची अचूकता कमी झाल्याबाबत चिंता व्यक्त.Climate Based Agriculture : अनेकवेळा प्रतिकूल हवामानाचा शेतीला फटका बसतो. यामुळे जे शेतकरी कृषी-हवामानाचा योग्य अंदाज घेऊन शेतीच्या कामाचे नियोजन करतील, ते दरवर्षी सुमारे १२ हजार रुपये वाचवू शकतील, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चने केलेल्या अलीकडील एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे..भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी राष्ट्रीय परिषदेत याबाबत माहिती दिली. बागायतीवर हवामान बदलाचा परिणाम या विषयावर ही परिषद होती. श्री कोंडा लक्ष्मण तेलंगणा फलोत्पादन विद्यापीठ, तेलंगणा सरकार, नाबार्ड आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते..AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी.महापात्रा यांनी त्यांच्या संबोधनात, हवामान अनुकूल शेती ही तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. विशेषतः बागायती पिकांबाबत त्यांनी नमूद केले की, "कमी पाऊस असणाऱ्या भागातील सीमांत शेतकऱ्यांचा संदर्भ असलेल्या या अभ्यासातून असे दिसून आले की हवामानाचा अंदाज घेऊन शेतीच्या कामाची योग्य तयारी केल्याने, शेतकरी दरवर्षी १२ हजार वाचवू शकले. ही छोट्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची रक्कम आहे.".Agriculture Technology: पीक अवशेषातून हरित ऊर्जा निर्मितीचे कार्बन-निगेटिव्ह तंत्रज्ञान.औद्योगिक क्रांतीनंतर मानवाच्या कृतींमुळे हवामानात तीव्र बदल झाला. परिणामी हवामान अंदाजांची अचूकता कमी झाल्याबाबत मोहापात्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे..पूर्वी हवामान अंदाजविषयक इशारे तीन दिवस आधीच देता येत होते; पण आता ते फक्त दीड दिवसांपर्यंत कमी झाले. ही आव्हाने असुनदेखील, अलीकडच्या काळात हवामानाच्या अचूक अंदाजांमुळे पूर, वीज कोसळणे आणि हवामानाशी संबंधित इतर आपत्तींमुळे होणाऱ्या जीवितहानीचे प्रमाण कमी झाले आहे, असे त्यांनी नमूद केले..स्मार्ट शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी पर्यावरण आणि हवामानाशी संबंधित आकडेवारी सर्व नागरिकांसाठी नियमितपणे जारी करण्याचे आवाहन केले..अन्नसुरक्षेसोबत पोषणसुरक्षाही महत्त्वाचीसध्याचे संशोधन आणि धोरणे प्रामुख्याने अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यावर केंद्रित राहिली आहेत. पण यासोबतच देशाच्या पोषणसुरक्षेचे उदिष्ट्य साध्य करण्यावरही भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.