MPKV Radio Center : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘फुले कृषी वाहिनी’ सुरू

MPKV Rahuri News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘कम्युनिटी रेडिओ सेंटर’ची फुले कृषी वाहिनी (९०.८ एफ. एम.) सुरू केली आहे. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते या वाहिनीचे बुधवारी (ता. १८) उद्घाटन झाले.
MPKV, Rahuri
MPKV, RahuriAgrowon
Published on
Updated on

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘कम्युनिटी रेडिओ सेंटर’ची फुले कृषी वाहिनी (९०.८ एफ. एम.) सुरू केली आहे. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते या वाहिनीचे बुधवारी (ता. १८) उद्घाटन झाले.

संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. आनंद सोळंके, डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. भगवान ढाकरे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे व रेडिओ सेंटरचे प्रमुख अधिकारी डॉ. आनंद चवई उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MPKV, Rahuri
MPKV NIRF Rank : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘एनआयआरएफ’मध्ये मानांकन

कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले, ‘‘तंत्रज्ञान प्रसारासाठी रेडिओ हे फार प्रभावी माध्यम आहे. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याची मोठी मदत होईल. शेतकऱ्यांप्रती विद्यापीठाची असलेली सामाजिक बांधिलकी या या रेडिओ सेंटरद्वारे अधिक घट्ट होईल.’’

MPKV, Rahuri
MPKV Rahuri : ‘एमपीकेव्ही’चे १९ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी बॅंकॉकला रवाना

डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे स्वतःचे रेडिओ सेंटर असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी मदत होईल.’’

डॉ. आनंद चवई यांनी सूत्रसंचालन केले. या रेडिओ सेंटरमध्ये रेडिओ जॉकी म्हणून ओंकार व्यवहारे, भाग्यश्री जोशी व सोनाली पुंड तर लिपिक म्हणून प्रकाश मुसमाडे हे काम पाहत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com