
Nagar News : शेतकऱ्यांना कृषिविषयक सल्ला वेळेवर मिळणे महत्त्वाचे असून, विद्यापीठाने तयार केलेली फुले बळीराजा ही डिजिटल कृषी सल्ला देणारी प्रणाली (Agriculture Advice System) स्थानिक परिस्थितीनुसार वेळेवर व अचूक सल्ला देणारी आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agriculture University) तयार केलेले फुले बळीराजा हे अॅप पूरक असून, ते प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.
कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विद्यापीठ, जी.आय.झेड., मॅनेज आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘फुले बळीराजा या डिजिटल कृषी सल्ला प्रणालीची ओळख’’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी डॉ. सुनील गोरंटीवार होते.
हैदराबाद येथील मॅनेज संस्थेचे आय. टी. विभागाचे सहायक संचालक डॉ. जी. भास्कर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. दिलीप पवार, डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. उत्तम होले, डॉ. जयप्रकाश गायकवाड, डॉ. मुकुंद शिंदे, रणजित जाधव हे उपस्थित होते.
नवीन होरो व हिमांशू वर्मा हे ऑनलाइन उपस्थित होते. या वेळी डॉ. भास्कर म्हणाले, की या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना या फुले बळीराजा प्रणालीची पुरेशी माहिती मिळणार आहे.
या संदर्भात फुले बळीराजा प्रणालीवरील विद्यापीठातील व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना मॅनेज, हैदराबाद संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. तानाजी नरुटे यांनी दिवसेंदिवस बदलणारे हवामान व त्याचा शेतीवर होणारा परिणाम यावर फुले बळीराजा प्रणाली फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले.
विस्तार कार्यकर्त्यांनी या फुले बळीराजा प्रणालीचा अभ्यास करून ती अवगत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मुकुंद शिंदे यांनी कार्यशाळेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अवधूत वाळुंज यांनी केले. तर जी. आय. झेड. प्रो-सॉईल प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. गोकूळ वामन यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.