Co-Operative Ginning Mill : जिनिंग-प्रेसिंग जमीन विक्रीप्रकरणी याचिका

Ginning-Processing Land : येथील शेषराव पाटील जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या कोट्यवधींच्या जमीन विक्री प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
At the ginning factory Production at half capacity
At the ginning factory Production at half capacity
Published on
Updated on

Yavatmal News : येथील शेषराव पाटील जिनिंग-प्रेसिंग सहकारी संस्थेच्या कोट्यवधींच्या जमीन विक्री प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनासह संबंधितांना न्यायालयाने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था, पुसद (जि. यवतमाळ) या संस्थेच्या कार्ला रस्त्यालगत शहराच्या मध्यवस्तीतील १०० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेली जमीन जिनिंगच्या संचालक मंडळाने अधिकारी वर्गाला हाताशी धरून नियम व अटीला धाब्यावर बसवीत नागपूरच्या प्लेस्टो कंपनीला अवघ्या ३५ कोटी एक लाख रुपयांत विकली. याविरुद्ध येथील सामाजिक कार्यकर्ता सतीश गुलाबचंद मालपाणी यांनी सर्वस्तरावर वेळोवेळी शासनाकडे तक्रारी व पाठपुरावा केला.

At the ginning factory Production at half capacity
Cotton Ginning Industry : संत्रा पट्ट्यात शेतकऱ्यांनी उभारला कापूस जिनिंग उद्योग

जमीन विक्रीची निविदा काढतानादेखील नियमांना पायदळी तुडविले गेले होते. कोणत्याही शासकीय विहित पद्धतीचा अवलंब न करता या जमिनीची विक्री संपूर्णपणे बेकायदेशीररीत्या झाल्याबाबतची व वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातदेखील संदिग्ध असल्याबाबत उल्लेख करण्यात आला होता.

At the ginning factory Production at half capacity
Ginning Industry : कापसाची आवक नसल्याने ७० टक्‍के जिनिंग उद्योग बंद

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने खरेदीची कार्यवाही रद्द करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली. परंतु शासनस्तरावर ठोस कार्यवाही होत नसल्याने श्री. मालपाणी यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

त्यानुसार न्यायालयाने महाराष्ट्र शासनासह संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात याचिकाकर्त्यांकडून अमोल पाटील व वैभव पत्रे यांनी बाजू मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com