Pest Disease Management : मोबाइल ॲपद्वारे पिकांवरील कीड-रोगांची होणार ओळख

Crop Management : केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम (एनपीएसएस) या मोबाइल ॲपद्वारे पिकांवरील कीड-रोगांची ओळख करून देत त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Buldana News : केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम (एनपीएसएस) या मोबाइल ॲपद्वारे पिकांवरील कीड-रोगांची ओळख करून देत त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.

जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. केंद्र शासनाचे केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राचे (नागपूर) सहसंचालक डॉ. ए. के. बोहरीया, उपसंचालक डॉ. मनीष मोंढे, पीक संरक्षण अधिकारी उपस्थित होते. नॅशनल पेस्ट सर्विलन्स सिस्टीम हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घेतले असल्यास शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकांची निरीक्षणे घेऊन कीड-रोगांची प्राथमिक माहिती त्यात नमूद करावी.

Agriculture
Pest Management : गेंड्या भुंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

त्यावर शेतकऱ्यांना तत्काळ उपायोजना सुचविल्या जातात व कीटकनाशक वापराबाबत माहिती मिळते. त्यामुळे पिकावर तत्काळ फवारणी करून होणारे नुकसान टाळता येणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. सद्यःस्थितीमध्ये या ॲपद्वारे मिरची, कापूस, आंबा, मका व भात या पिकाबद्दलची कीड व रोग व्यवस्थापन बाबतची माहिती नोंदवू शकतो.

Agriculture
Chana Pest Management : हरभरा पिकातील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

कालांतराने यात इतरही पिकांचा समावेश करण्यात येणार असून शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे पिकांवरील कीड व रोगांबाबतची निरीक्षणे नोंदवू शकतात. या प्रशिक्षणावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक भास्कर शेळके यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर यांनी प्रास्ताविक केले. तंत्र अधिकारी सुवर्णा आदक यांनी आभार मानले.

चिखली तालुक्यातील केळवद येथील गुंफाबाई गवई यांच्या तूर पिकाची पाहणी केली असता पीक सद्यःस्थितीत शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून पिकावर मर व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या आत आढळून आला.

तसेच अशोक पाटील यांच्या हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली यामध्ये मर रोगाची लागण नुकसान पातळीच्या वर आढळून आली. प्रगतिशील शेतकरी प्रकाश बोंद्रे यांच्या शेतात हरभरा पिकाची पाहणी करण्यात आली असून उपाययोजना सुचविण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com