Sugarcane Season 2024 : ऊस हंगामाचे पडघम वाजू लागले

Sugarcane Crushing Season : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचे पडघम वाजू लागले आहेत. कर्नाटक शासनाने यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, असा आदेश काढला आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचे पडघम वाजू लागले आहेत. कर्नाटक शासनाने यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, असा आदेश काढला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील गळीत हंगाम कधी सुरू होईल याची उत्‍सुकता आहे. राज्यातील यंदाचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरनंतर सुरू केल्‍यास कारखान्‍यांना नियोजन करणे सुलभ होईल, असा सूर कारखाना वर्तुळातून आहे.

येत्या दोन महिन्‍यांचा काळ हा निवडणुकीचा असल्याने मंत्री समितीने तातडीने बैठक घेऊन गळीत हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. गेल्या वर्षी अंतिम टप्प्‍यात कारखान्यांनी ऊस नेण्यासाठी उत्पादकांना आटापिटा करावा लागला, हा अनुभव पाहता हंगाम लवकर सुरू झाल्यास ऊस तोडणीच्या दृष्‍टीनेही ते महत्त्वाचे ठरेल, असाही मतप्रवाह आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात यंदाचा हंगाम कधी सुरू होईल या बाबत उत्सुकता आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : पाचट कपातीचे सव्वादोन कोटी परत

गेल्‍या दोन महिन्यांत राज्‍यातील बहुतांशी ऊस पट्ट्यात चांगला पाऊस झाला. जूनपर्यंत तोडणीसाठी येणाऱ्या उसाची बिकट अवस्‍था होती. अनेक शेतकऱ्यांना वेळेत पाणी देणे शक्‍य न झाल्याने उसाची वाढ खुंटली. जुलैनंतर मात्र चांगला पाऊस झाला. जो ऊस पुराच्‍या पाण्यात पूर्ण बुडालेला नाही त्या उसाची वाढ चांगली झाली.

निचरा होणाऱ्या जमिनीतील उसाला जुलै, ऑगस्टच्या पावसाने आधार दिला. काळ्या जमिनीतील अनेक ठिकाणी अजूनही उसाचे क्षेत्र वाफशाखाली आलेले नाही. सप्‍टेंबर, ऑक्टोबर मध्येही खंडाने पावसाची शक्यता वर्तविण्‍यात आली आहे. थांबून थांबून जर पाऊस झाला तर उसासाठी तो फायदेशीर ठरेल असे ऊस उत्‍पादकांचे म्हणणे आहे. यामुळे सध्या तोडणीला येणाऱ्या उसाला पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नाही, अशी चिन्‍हे आहेत.

अंदाज व्यक्त करणे कठीण

सुरुवातीला पाण्याची टंचाई आणि पावसाळ्यात चांगल्‍या पावसामुळे उसाचे नेमके किती उत्पन्न निघेल या बाबत साशंकता आहे. गेल्‍या दोन-तीन वर्षांपूर्वीचा अंदाज आणि प्रत्यक्षात ऊस तोडणी सुरू होतानाचे उत्पन्न यात मोठा फरक जाणवला. यामुळे यंदा उसाचे उत्पादन किती वाढेल याचा नेमका अंदाज अजून कारखाना पातळीवरही आलेला नाही.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season 2024 : नांदेड विभागात यंदा ९०.२८ लाख टन गाळपाची शक्यता

ऊस उत्पादकांचे हाल टाळण्याची गरज

गेल्या वर्षी उसाची तोड करणे शेतकऱ्यांसाठी दिव्य ठरले. हंगामाच्या मध्यालाच ऊस पेटवून कारखान्याला नेण्याची वेळ ऊस पट्ट्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वेळेत ऊस तोडणी करण्यात कारखानेही हतबल ठरले. ऊसदराबाबतच्या आंदोलनामुळेही हंगाम लांबल्याची टीका झाली. या पार्श्‍वभूमीवर यंदा कारखाने कधी सुरू होतात याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

यंदा कर्नाटकचा हंगाम थोडा उशिरा सुरू होणार असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील ऊस कर्नाटकातील कारखान्यांना लवकर जाण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी कर्नाटकातील हंगाम महाराष्ट्रापेक्षा लवकर सुरू होतो त्याचवेळी सीमा भागात ऊसदर आंदोलनामुळे हंगाम ठप्प असतो याचा फायदा घेत कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातील उसाचे गाळप करतात असे चित्र असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी असू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com