Chana Pest
Chana PestAgrowon

Chana Pest : शिरूर अनंतपाळला हरभऱ्यावर अळीचे संकट

Chana Wild Disease : हरभरा पिकावर रोप कुरतडणारी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर वरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडण्याला सुरुवात केली आहे.
Published on

Beed News : हरभरा पिकावर रोप कुरतडणारी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर वरील हरभऱ्याचे पीक धोक्यात आले असून, अनेक शेतकऱ्यांनी पीक मोडण्याला सुरुवात केली आहे. तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

मात्र हरभऱ्यावर कटवर्म किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गत दहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे या किडीला पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे जमिनीमध्ये कोशात असलेली अळी बाहेर आली असून, हरभऱ्याच्या छोट्या रोपांची शेंडी कुरतडत असल्याचे दिसून येत आहे.

Chana Pest
Chana Pest Disease : हरभऱ्यावर मर रोग, घाटे अळीचा प्रादुर्भाव

तालुक्यातील शेतकरी हरभरा पिकावर महागडी औषधांची फवारणी करीत असताना ही अळी अटोक्यात येत नसून नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक मोडण्याला सुरुवात केली आहे. सांगवी येथील बळिराम बिरादार, प्रवीण पाटील या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक मोडले आहे.

Chana Pest
Chana Pest Management : हरभरा पिकातील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र घाट आळीच्या प्रादुर्भावाने शेतीतील हरभऱ्याच्या रोपाची शेंडी खुडले. त्यामुळे त्यांनी पाच एकरातील पीक मोडले पेरणी करता त्यांना ६५ हजार रुपये खर्च आला होता. त्यांना नुकसान सहन करावे लागणार असून दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

हवामानात बदलामुळे आळ्यांचा प्रादुर्भाव

याबाबत कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ यांच्याकडे संपर्क साधला असता मधल्या काळात हवामानात बदल झाल्याने आळ्यांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे बहुतांशी हेक्टरवर हरभरा पिकाची नुकसान झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com