Nashik Godavari River News : गोदावरी नदीपात्रामध्ये नाशिक शहरातील सांडपाणी तसेच येथील औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त पाणी (Chemical water) मिसळत असल्याने नदीचे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे.
या प्रदूषणामुळे नदीमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहे.
त्याचा परिणाम गोदावरी नदीकाठालगत असलेल्या गावांना होत असून, साथीचे रोग व प्रदूषण वाढत आहे.
हे टाळण्यासाठी गोदावरी नदीतील पानवेलीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा, अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांची अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली आहे.
निफाड तालुक्यातील चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावातील नळपाणी पुरवठा योजनांवर होत आहे.
या परिसरातील नागरीकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अनेक साथीच्या रोगांना बळी पडावे लागत आहे.
गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने महानगरपालिकेसह संबंधित विभागाकडे तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही.
नदीतील प्रदूषणाबाबत सातत्याने शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गोदावरी काठालगत असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झालेली आहे.
म्हणून नदीचे प्रदूषण थांबविण्याबरोबरच औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी बनकर यांनी केली.
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतून पाच मोठ्या महापालिका पाणी उचलतात. या नदीपात्रात नेरळच्या सगुणा फाउंडेशनच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून जलपणीवर औषध फवारणी केली जात होती.
याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशा होऊन पात्र जलपर्णीमुक्त झाले. देशातील काही नद्यांमध्ये हा प्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.