Water Management : दहा हजार हेक्टरचे पाणी नियोजन करणारा पेनटाकळी महासंघ ठरला विजेता

Pentakli Mahasangh : मेहकर तालुक्यातील पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पातील पाण्याच्या योग्य नियोजनासाठी २००५ पासून पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघ कार्यरत आहे.
Water Management
Water ManagementAgrowon
Published on
Updated on

Buldana News : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था, महासंघास सन २०२३ या वर्षाचा राष्ट्रीय जल पुरस्कार घोषित झाला आहे. या महासंघाच्या नेतृत्वात कार्यरत पाणी वापर संस्थांच्या मदतीने सुमारे १० हजार हेक्टरपर्यंत सिंचनाचे नियोजन केले जात आहे.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पातील पाण्याच्या योग्य नियोजनासाठी २००५ पासून पेनटाकळी पाणी वापर संस्था महासंघ कार्यरत आहे. या महासंघाच्या कार्याची दखल घेत जलशक्ती मंत्रालयाने वरील पुरस्कारासाठी निवड केली.

Water Management
Water Management : ‘जलयुक्त’च्या अनुभवातून धडा घेणार का?

पाण्याचा काटकसरीने वापर, योग्य नियोजन व जास्तीत जास्त सिंचन याकरिता पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था महासंघाने हा पुरस्कार पटकावला आहे. या महासंघांतर्गत १२ छोट्या पाणी वापर संस्था आहेत. एकूण १० हजार ७०० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी असून, ९८८४ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी आहे.

या आधी ही महासंघास २०१४-१५ चा विमलताई बेलसरे जल पुरस्कार, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा २०१७- १८चा पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार मंगळवारी (ता. २२) दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

Water Management
Water Management : जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन

संपूर्ण देशातून पेनटाकळी महासंघ प्रथम, कर्नाटक राज्य दुसरा तर तमिळनाडू राज्य तिसरे आले आहे. या पुरस्काराबद्दल महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, कार्यकारी संचालक तथा सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता रमेश गट्टाणी व सर्व संचालकांचे अभिनंदन होत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व या विभागाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाने वेळोवेळी काम केले. वेळोवेळी लाभधारक शेतकऱ्यांना भेटणे, वसुली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून सिंचनाचा लाभ घेण्यासाठी तयार करण्याचे काम केले जाते.
- राजेंद्र गाडेकर, अध्यक्ष, पेनटाकळी प्रकल्प पाणी वार संस्था, महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com