Pench National Park : पेंच व्याघ्र सफारी मे महिन्यात ‘हाउसफुल्ल’

Pench Tiger Project : हमखास व्याघ्र दर्शनामुळे नावारूपास आलेल्या ताडोबा- अंधारी प्रकल्पानंतर आता पेंच प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.
Pench Tiger Safari
Pench Tiger SafariAgrowon

Nagpur News : हमखास व्याघ्र दर्शनामुळे नावारूपास आलेल्या ताडोबा- अंधारी प्रकल्पानंतर आता पेंच प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळेच मागील वर्षी एक लाखाचा पर्यटकांचा आकडा पार केलेला असताना येथील सफारी मे अखेरपर्यंत ‘हाउसफुल्ल’ झाली आहे.

मागील दोन वर्षांपासून पेंच प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पॅराग्लायडिंग, हॉट बलून, कृषी पर्यटनासोबत व्याघ्र पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळेच या व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे ‘ऑनलाइन बुकिंग’ हाउसफुल्ल झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटन सुरू झाले. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टी, ख्रिसमस आणि हिवाळी अधिवेशनातही येथे पर्यटकांची तुफान गर्दी होती.

Pench Tiger Safari
Pench Tiger Reserve forest : ‘फायर डिटेक्शन सिस्टीम’चा वापर पेंच प्रकल्पात होणार

राज्यात सर्वाधिक वाघ असल्याने ताडोब्यात वाघाचे हमखास दर्शन होते अशी ख्याती निर्माण झाली होती. तीच प्रचिती आता पेंच व्याघ्र प्रकल्पाला मिळाल्याने पर्यटकांचा ओढा या प्रकल्पाकडे वाढलेला आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातही वाघ दिसत असल्याने तेथीलही बुकिंग हाऊस फुल्ल आहे. यंदा अवकाळी पावसाने हवामानात बदल झाला असला तरी दुपारी ऊन पडत असल्याने वन्यप्राण्यांचे दर्शन हमखास होत आहेत. त्याच आकर्षणापोटी हवामानाचा विचार न करता पर्यटक पेंचसह उमरेड-कऱ्हांडलाकडे वळू लागले आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत.

त्यामुळे सरकारी सुट्ट्यांचा मुहूर्त पाहून अनेक पर्यटकांनी व्याघ्र पर्यटनस्थळांसाठी बुकिंग केले आहे. विदर्भासह मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच व्याघ्र प्रकल्पातही हीच स्थिती आहे.

Pench Tiger Safari
Pench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्प आगमुक्त करण्याचा संकल्प

व्याघ्रप्रकल्पांचे नागपूरपासूनचे अंतर (किमीमध्ये)

पेंच ८५

बोर ६८

उमरेड कऱ्हांडला ४५

पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खुर्सापार प्रवेशद्वाराचे मे महिन्याचे बुकिंग चांगले झाले आहे. हाउसफुल्ल आहे. इतर प्रवेशद्वारांचे बुकिंगही होत आहे. वाघासह इतरही उपक्रमांमुळे पर्यटकांचा कल वाढलेला आहे.
पूजा लिंमगावकर, सहायक वनसंरक्षक
पेंच प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे त्याचे वनावरील अवलंबत्व कमी होण्यास मदत होत आहे.
संदीप भारती, सहायक वनसंरक्षक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com