Pench Dam : नवेगाव खैरी पेंच धरणाचे दोन वक्रद्वार उघडले

Dam Water Release : पेंच उजवा मुख्य कालव्यावर बाभूळवाडा गावाजवळ पुलाचे काम सुरू आहे. तसेच लघु कालव्याचे मुख्य शीर्ष विमोचकाचे खोदकाम सुरू आहे.
Pendh Dam
Pench DamAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : पारशिवनी तालुक्यातील नवेगांव खैरी पेंच धरणाचे दोन वक्रद्वार शनिवारी (ता. १९) दुपारी ०.५० सेमी उघडले असून त्यातून ३० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले असल्याची माहिती पेच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे उपविभागीय अभियंता एन.एस सावरकर यांनी दिली.

पेंच उजवा मुख्य कालव्यावर बाभूळवाडा गावाजवळ पुलाचे काम सुरू आहे. तसेच लघु कालव्याचे मुख्य शीर्ष विमोचकाचे खोदकाम सुरू असून हे काम ‘सेफ लेव्हल’ला यायला कमीत कमी एका आठवड्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती एन. एस. सावरकर यांनी दिली.

Pendh Dam
Jalgaon Water Crisis : जळगाव जिल्ह्यात ५६५ गावांत पाणीटंचाई

नागपूर महानगरपालिकेची पेंच उजव्या मुख्य कालव्यावरून पाणी मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने त्यांच्या मागणीनुसार व पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे कार्यकारी अभियंता केतन आकुलवार यांच्या आदेशाने शनिवारी (ता. १९)दुपारी ३ वाजता पेंच धरणाचे दोन वक्रद्वार ०.५० सेमी उघडले. त्या

Pendh Dam
Bhima Water Crisis : भीमा नदीचे पात्र पडले कोरडे

धरणातून ३० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले. त्यामुळे नदी काठावरील गावकरी आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी स्वतः ची काळजी बाळगावी, असे आवाहन पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे उपविभागीय अभियंता एन .एस सावरकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com